ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमाला पुष्प दुसरे
जत,(प्रतिनिधी)-
भौतिक साधनांतून मिळणारे सुख चिरकाल टिकणारे नसून साधनेचा मार्गच खरा जीवनाचा आनंद देतो, असे प्रतिपादन गणेश शिंदे (पुणे)यांनी जत येथील ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना केले.
जत येथील रामराव विद्यामंदिरच्या पटांगणावर पार पडलेल्या 24 व्या व्याख्यानमालेत जीवन सुंदर आहे या विषयावर श्री. शिंदे बोलत होते म्हणाले, जीवन जगताना ते सुंदर होण्यासाठी देण्याची दानत आपल्यात असली पाहिजे.आपले सुख,दु:ख हे आपलेच असले पाहिजे.आपण दुसर्याच्या सुख-दु:खातून सुखाचे मोजमाप करत असतो. हे चुकीचे असून दुसर्याला आनंदी पाहायला शिकले पाहिजे.यासाठी दान महत्त्वाचे आहे.
सुखी जीवनासाठी मुलांसह सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. त्यांच्या दु:खात सहभागी झाले पाहिजे.प्रत्येकाकडे ईश्वराने एक श्रीमंती दिली आहे.कला दिली आहे. ती ओळखून त्याचा विकास केला पाहिजे. या श्रीमंत कलेने जग सुंदर करता येते, असेही श्री. शिंदे म्हणाले.
प्रारंभी स्वागत प्राचार्य वसंत बोराडे यांनी केले.यावेळी मराठा मंदिर संस्थेचे सरचिटणीस दीपक देशमुख, मल्लिकार्जून मोगले, प्रकाश जमदाडे,प्रभाकर जाधव आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment