Sunday, December 30, 2018

शासकीय कर्मचार्‍यांना 109, तर शिक्षण क्षेत्राला 140 दिवस सुट्या


2019 मध्ये शासकीय कर्मचार्यांना सुट्ट्यांची देणगी
जत,(प्रतिनिधी)-
नव्या दिनदर्शिकेने शासकीय कर्मचारी व शैक्षणिक जगताला सुट्ट्यांची देणगी बहाल केली. त्यामुळे नोकरशाही खूश आहे. रविवारसह शासकीय कर्मचार्यांना 109 तर शिक्षण क्षेत्रात काम करणार्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना 140 सुट्ट्या मिळणार आहेत.

जानेवारीत रविवारच्या 6, 13, 20, 27 व प्रजासत्ताक दिनाची 26 अशा पाच, फेब्रुवारीमध्ये 3,10,17, 24 ला रविवार व शिवजयंती 19 अशा पाच, मार्चमध्ये पाच रविवार 3, 10, 17, 24, 31 आणि महाशिवरात्री 4, धुलीवंदन 21 अशा एकूण 7 सुट्ट्या, एप्रिलमध्ये 7, 14, 21, 28 असे चार रविवार व गुढीपाडवा 6, रामनवमी 13, महावीर जयंती 17, गुड फ्रायडे 19 अशा तब्बल 8 सुट्ट्या दिल्या आहेत. मे महिन्यात 5, 12, 19, 26 हे चार रविवार तर महाराष्ट्र दिन 1, गुरुपौर्णिमा 18 अशा 6 दिवस,
जून महिन्यात 2, 9, 16, 23, 30 व रमजान ईद 5 अशा 6 दिवस, जुलैमध्ये चार रविवार 7, 14, 21, 28 ऑगस्टमध्ये रविवार 4, 11, 18, 25 व अन्य सुट्ट्या स्वातंत्र्यदिन 15, पारशी नववर्षदिन 17, बकरी ईद 12 एकूण 7, सप्टेंबर 1, 8, 15, 22, 29 पाच रविवार, गणेश स्थापना 2 व मोहरम 10 एकूण 7 सुट्ट्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात 6, 13, 20, 27 ला रविवार व गांधी जयंती 2, दसरा 8,
दिवाळी पाडवा 28 एगूण 7 सुट्ट्या नोव्हेंबरला 5 सुट्ट्या आहेत. पैकी रविवार 3, 10, 17, 24 व अवांतर एक गुरुनानक जयंती 12, शेवटच्या डिसेंबर 2019 मध्ये रविवारच्या 1, 10, 15, 22, 29 पाच व नाताळ 25 अशा एकूण 6 सुट्ट्या मिळतील. अशा या वर्षात 73 सार्वजनिक तसेच महिन्यात दुसर्या व चौथ्या शनिवारच्या 24, त्याचबरोबर प्रत्येक कर्मचार्यांच्या 12 किरकोळ रजा मिळून प्रत्येक शासकीय कर्मचारी 109 दिवस हक्काच्या सुट्ट्या उपभोगणार आहे. शैक्षणिक जगताला सार्वजनिक 73, किरकोळ रजा 12 व उन्हाळी-दिवाळी 55 मिळून 140 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. याशिवाय 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत. प्रत्येकाच्या वैद्यकीय रजा, आकस्मित बंद-हरताळ इत्यादींच्या सुट्ट्या बोनस समजता येतील.

No comments:

Post a Comment