Showing posts with label सांस्कृतीक. Show all posts
Showing posts with label सांस्कृतीक. Show all posts

Sunday, May 26, 2019

घोंगडी खरेदीकडे ग्राहकांची पाठ


जत,(प्रतिनिधी)-
जतसह कवठेमहांकाळ, सांगोला, खानापूर, आटपाडी भागात मोठ्या प्रमाणात मेंढीपालनाचा व्यवसाय केला जातो. मोठ्या प्रमाणात पुर्वीपासून शेळ्यामेढ्यांचे कळप आढळतात. काहीजणांच्या तर पूर्ण चरीतार्थच या व्यवसायावर चालत असतो. मेषपालनाबरोबर त्याठिकाणी लोकर कताईचाही दुय्यम व्यवसाय केला जातो. लोकरीपासुन उत्कृष्टरीत्या घोंगडी व जेनची निर्मिती होत असते. परंतू सध्याच्या आधुनिक जमान्यात तयार धाटणीतील रग, चादर व ब्लँकेट चा सर्रास वापर होत असल्याने घोंगडी व जीनची मागणी कमी आहे. ग्राहकांनी याकडे पाठ फिरवल्याने हा व्यवसाय धोक्यात आला आहे.

Sunday, May 19, 2019

पबजी गेमचे तरुणांना वेड; मनोरूग्ण होण्याचा धोका


जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील आणि तालुक्यातील तरुण ऑनलाइन पबजी मोबाइल गेमच्या आहारी जात असल्याने तासंतास मोबाइल घेऊन बसत असून याकडे पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मोबाईलचा अधिक वापर आणि पबजी गेमचे वेड यामुळे युवा वर्ग मनोरुग्ण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

माडग्याळमध्ये बसस्थानक परिसरात होतेय वारंवार वाहतूक कोंडी


जत,(प्रतिनिधी)-
जत-उमदी या राज्यमार्गावर असलेल्या माडग्याळ (ता. जत) येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी फोडण्याची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही. त्यामुळे वाहनधारकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस, ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.
माडग्याळ येथे ही वाहतूक कोंडी सततची डोकेदुखी झाली आहे. दर शुक्रवारी माडग्याळ येथे भाजीपाला आणि जनावरांचा मोठा बाजार भरतो. या आठवडा बाजारदिवशी होणार्या वाहतूक कोंडीने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दिवसंदिवस वाढणारे अतिक्रमण याला कारणीभूत असून ग्रामपंचायत आणि प्रशासनाने हे अतिक्रमण काढण्याची आवश्यकता आहे. नेहमी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे,पण पोलिस नेहमी गायबच असतात. माडग्याळ (ता.जत) येते शुक्रवारी आठवडी भाजीपाला आणि जनावरांचा बाजार भरतो. गेल्या शुक्रवारी सुमारे दीड किलोमीटर ट्रॅफिक जाम झाले होते. दुचाकी विस्कळीतपणे लावल्या होत्या. त्यातच मध्येच दुचाकी घुसत असल्याने मोठ्या वाहनांना बसस्थानकाचे ठिकाण पार करायला सुमारे दोन तास प्रतीक्षा करावी लागली.अर्थात हे इथले नेहमीचे चित्र आहे. वाहतूक हाताळायला कोणतीच पोलीस अथवा इथली ग्रामपंचायतीची यंत्रणा उपस्थित नव्हती. वाहतूक कोंडी त्यातून लोकांना होणारा विलंब चीड आणणारा होता, त्यातच रस्त्याच्या एका बाजूला गटारीचे काम सुरू असल्याने त्यात आणखी भर पडली होती.
 मध्यंतरी येथील अतिक्रमणे काढण्यात आली होती,पण पुन्हा ही अतिक्रमणे झाली आहेत. हा जत-उमदी- चडचणला जायला हा एकच राज्य मार्ग आहे. या मार्गावरून सोलापूर, मंगळवेढा, चडचण वाहने जातात.त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. मोटारसायकली कशाही रस्त्यावर अडव्या-तिडव्या लावणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. बाजाराच्यादिवशी पोलिस दुसर्याच जुळणीला लागत असल्याने या बाजारातल्या कोंडीकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय या वाहतूक कोंडीकडे लोकप्रतिनिधीपासून प्रशासनापर्यंत सगळ्यांचीच उदासीनता संताप आणणारी आहे.
(माडग्याळ येथे गटारीचे काम आणि दुचाकी वाहने अस्ताव्यस्त रस्त्यावर लावल्याने सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.)

Friday, May 17, 2019

जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांना मिळणार मानधन


जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषद व समाज कल्याण यांच्यावतीने या वर्षी 60 कलावंतांची मानधनासाठी निवड करण्यात आली आहे. 9 तालुक्यातुन 60 जणांची निवड झाली आहे. ही योजना सन 1954-55 पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये वृद्ध कलावंत, साहित्यिक यांनी मोलाची भर घातली आहे अशा व्यक्तीचा समावेश शासकीय कलाकार मानधनासाठी केला जातो.

Thursday, April 4, 2019

गुढा पाडव्याला मुहुर्ताच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग


जत,(प्रतिनिधी)-
हिंदू नववर्ष असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दाखल झालेल्या साखरेच्या गाठीने जत बाजारपेठेलाही गोडवा आला आहे. सणाच्या पूर्वसंध्येला साखरेच्या माळा चिव्यांची काठी अशा पूजेच्या साहित्याबरोबरच मुहुर्ताच्या खरेदीची ही सर्वत्र लगबग सुरू झाली आहे.

Monday, April 1, 2019

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा : शिवाजी खांडेकर


जत,(प्रतिनिधी)-
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या युवकांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करून आपल्या आयुष्यातील करिअरला सुरवात करावी, असे प्रतिपादन शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे महासचिव शिवाजी खांडेकर यांनी केले. ‘येळवी यूथ फेस्टिव्हल -2019’चे आयोजन सावली फौंडेशन यांच्या वतीने आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

Saturday, March 30, 2019

जीवनात ईश्‍वरप्राप्तीशिवाय खरा आनंद मिळणे कठीण: झेंडॅ


जत,(प्रतिनिधी)-
 जीवनामध्ये खरा शास्वत आनंद प्राप्त करायचा असेल, तर ईश्वरप्राप्तीशिवाय पर्याय नाही. ईश्वरप्राप्तीनेच मनुष्य जीवन आनंदी, सुखमय, समाधानी बनू शकते, असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळ शाखा, कोसारी यांच्यावतीने आयोजित विशाल सत्संग कार्यक्रमामध्ये संत निरंकारी मंडळाचे प्रचारक सचिन झेंडे (मुंबई) यांनी केले.

Wednesday, March 27, 2019

आदमापुरात बाळूमामा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम


जत,(प्रतिनिधी)-
 श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवानिमित्त प्रतिवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षीही बुधवार दि. 26 मार्चपासून ते 3 एप्रिल 2019 अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांनी भंडारा उत्सवास प्रारंभ होत आहे.

Sunday, March 17, 2019

येळवीत युथ फेस्टिवलचे आयोजन


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील येळवी येथील सावली फौंडेशनच्यावतीने येळवी युथ फेस्टिवल 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलमध्ये 27 मार्चला युथ टॅलेंट सर्च परीक्षा तर 31 मार्चला मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात येळवी मॅरेथॉन यशवंतांची गौरवगाथा, मान्यवरांचे मार्गदर्शन, बक्षीस वितरण आणि माँ तुझे सलाम या सांस्कृतिक अशा कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आल्याची माहिती सावली फौंडॅशनचे अध्यक्ष सुनील साळे आणि सचिव प्रकाश गुदळे यांनी दिली.

Friday, March 8, 2019

बिळूरच्या काळभैरव देवस्थानला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा


जत,(प्रतिनिधी)-
 बिळूर (ता. जत) येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गतवर्ग दर्जा देण्यात आल्याची माहिती देवस्थान कमिटीचे चेअरमन सोमनिंग जीवनावर यांनी दिली. ते म्हणाले की, कर्नाटक व महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणार्या बिळूर (ता. जत) येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान कमिटी ने ग्रामीण तीर्थक्षेत्र विभागाकडे व दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.

Thursday, March 7, 2019

प्रत्येक ‘स्त्री’ने पर्यावरणाचा जागर करावा


सुखकर जीवन जगण्यासाठी पाणी, हवा देणारी पृथ्वी ही आपली माय म्हणून मानली जाते, तशी प्रत्येक घरातील स्त्री ही केंद्रस्थानी असते, तिला ही माय म्हणूनच मानले जाते. जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्रियांनी पर्यावरणाचा जागर करण्याची वेळ आली आहे. चार भिंतीचं घर... सभोवती अंगण... त्याला स्वच्छतेच्या संस्काराचं कोंदण...

Sunday, March 3, 2019

चिरतरुण फाल्गुन


निसर्गचक्राची परिक्रमा करताना अखेरचा मास फाल्गुनपाशी पाय आपोआपच रेंगाळतात. याचं कारण त्याचं मुग्ध रुप. सृष्टीच्या तारुण्याचा बहर म्हणजे फाल्गुन! कोणत्याही माणसाला तारुण्याच्या चीर आठवणींचं स्मरण करुन देणारा असा हा मास आहे. आत्यंतिक प्रणय आणि पराकोटीचा शोक हे तारुण्याचं वैशिष्ट्य असावं. फाल्गुनातील एखाद्या दुपारी निसर्गाकडे पाहत बसलं की आपोआप तारुण्यातील ऐन बहराच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात. गेलेल्यांच्या स्मरणानं मन घायाळ होतं. प्रौढ वयातही डोळ्यातून आसवं ठिबकायला लावण्याचं धारिष्ट्य या महिन्यात आहे. त्यामुळेच ऋतुचक्राच्या या अखेरच्या महिन्याशी रेंगाळण्याची मौज काही आगळीच ठरते.

पर्यावरण वाचवा


सुविधा आणि संपत्तीचा अति हव्यास, त्याबरोबरच अफाट लोकसंख्येमुळे वाढत्या गरजा यांच्यापोटी पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर आता धोकादायक स्थितीत पोहोचलेला आहे. त्यामुळे होणार्‍या पर्यावरण र्‍हासाचे दुष्परिणाम केवळ सजीवांच्या काही विशिष्ट जातींपुरते मर्यादित राहणार नाहीत तर भावी मानवी पिढ्याचे जीवनही धोक्यात येईल. ही सध्याची स्थिती आहे.

संगीत हे संस्काराचे उत्तम साधन

भारतात फार पूर्वीपासूनच संगीत प्रचलित असून यात भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत अशा दोन प्रमुख पदधती आहेत. याखेरीज भजन कव्वाली लावणी पोवाडा यांसारखे अनेक लोकसंगीताचे प्रकार भारतात प्रसिध्द आहेत. हाच परंपरेचा वसा घेतलेला तसेच आधुनिक काळाला संस्काराची शिदोरी देणारे संगीत व्यक्तिमत्व विकासाचे उत्तम साधन आहेत.

जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे


पूर्वीच्या काळी जमिनीवर बसून जेवण्याची प्रथा होती. मात्र बदलत्या जीवनशैलीमध्ये जमिनीपेक्षा टेबलावर बसून जेवण्याची प्रथा अधिक रूढ झाली आहे. काही घरांमध्ये आजही जमिनीवरच बसून जेवण्याची प्रथा आहे. जमिनीवर बसून जेवल्याने शरीराचं आरोग्य सुधारतं.
पचन सुधारते
जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते. या सतत होणार्‍या शारीरिक हालचालींमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.

Wednesday, February 27, 2019

कलेचा असाही उपयोग


समाजातल्या वंचितगरीब घटकातल्या मुलांकडे गुणवत्ता असते. कौशल्यं असतात. पण त्यांच्या या गुणवत्तेला व्यासपीठ मिळत नाही. ही गुणवत्ता जगासमोर येत नाही. सतरा वर्षांचा मानव केडिया या मुलांच्या गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देतोय.

Monday, February 25, 2019

चिमुरड्या सई पेटकरच्या नावावर चार विक्रम


जत,(प्रतिनिधी)-
सई पेटकर ही अवघ्या नऊ वर्षांची चिमुरडी! पण आज याच चिमुरडीने स्केटिंगवर लावणीचा ठेका धरून आणि प्रेक्षकांना धरायला लावून तिने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वंडर बुक, जिनिरस बुक, भारत वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या या अनोख्या कामगिरीची नोंद झाली आहे.

Thursday, January 24, 2019

सदाशिव पाटील यांच्या 'सुलभ हिंदी व्याकरण' पुस्तकाचे प्रकाशन


 
(सदाशिव पाटील यांच्या सुलभ हिंदी व्याकरण या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.संजीवकुमार भूशेट्टीवाय देवेंद्रप्पाएम.एस.हिरेमठशंभू ममदापूर यांच्या उपस्थितीत झाले.)
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील जिरग्याळ येथील शिक्षक सदाशिव पाटील यांच्या सुलभ हिंदी व्याकरण या पुस्तकाचे प्रकाशन अथणी (जि. बेळगाव) येथील श्रीमती सी.बी.रनमोडे विद्यालयात एका कार्यक्रमात करण्यात आले. अध्यक्षस्थानी शंभू ममदापूर होते.
अथणी येथील के.एल.. या संस्थेच्या श्रीमती सी.बी.रनमोडे विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सुलभ हिंदी व्याकरण या पुस्तकाचे प्रकाशन कर्नाटक विज्ञान परिषद (धारवाड)चे अध्यक्ष डॉ. संजीवकुमार भूशेट्टी, वाय.देवेंद्रप्पा, प्राचार्य एम.एस.हिरेमठ यांच्याहस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tuesday, January 15, 2019

बेवनूरमध्ये जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा


जत,(प्रतिनिधी)-
 बेवनूर (ता. जत) येथे संभाजी ब्रिगेड शाखेच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा 421 वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी केले.

Monday, January 14, 2019

जंगल वाचवण्यासाठी 2300 किलोमीटरची सायकल रपेट


जंगल वाचवा - निसर्ग वाचवा, पर्यावरणाचा बचाव करा, असा प्रबोधनपर संदेश देत पाच जणांची टीम 16 जानेवारी रोजी मालगाव (ता. मिरज) येथून झारखंड राज्यातील शिखरजीपर्यंत सायकल फेरी काढणार आहे. विशेष म्हणजे या सायकल फेरी पथकाचे प्रमुख एक शासकीय अधिकारी आहेत. शासकीय अधिकारीपदाची झूल काही काळ बाजूला ठेवून ते आपल्या चार साथीदारांसहसेव्ह फॉरेस्टमोहिमेवर जात आहेत.