जिल्हा
परिषद, पशुसंवर्धन विभागाच्यावतीने चारानिर्मिती योजनेंतर्गत
जिल्ह्यात 100 टक्के अनुदानावर आफ्रिकन टॉलचे 54 हजार 345 किलो मका बियाणे देण्यात येणार असल्याची माहिती
उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली. शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री.
बाबर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व गंभीर होत असणारा
चार्यांचा प्रश्न याचा विचार करून उपाध्यक्ष श्री बाबर यांच्या
प्रयत्नातुन पशुसंवर्धन विभागास वाढीव 25 लाख रुपयांची तरतूद
मिळाली आहे. जिल्हा वार्षिक योजना 2018-19 मध्ये वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत टंचाई परिस्थिती चारानिर्मिती
अंतर्गत मका बियाणे वाटप करण्यासाठी ही वाढीव तरतूद केली आहे. त्या तरतुदीतून मका बियाणे देण्यात येणार आहे. आफिक्रन
टॉल मका बियाणे 100 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.
इच्छुक शेतकर्यांनी पंचायत समितीमधील पशुधन विकास
अधिकारी, कृषी अधिकारी व संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याशी संर्पक
साधावा.
शेतकर्यांनी सात बारा
खाते उतारा, मागणी अर्ज देणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी बियाणे घेऊन चारा निर्मिती करावी,
असे आवाहन बाबर यांनी केले आहे. जिल्हा पशुसंवर्धन
अधिकारी विजय सांवत यानी केले आहे.
25 लाख रुपयांची वाढीव तरतूद, 100 टक्के अनुदान
तालुकानिहाय बियाणेवाटपाचे उद्दिष्ट बियाणे वाटप प्रमाण पुढील प्रमाणे ( किलोत) ः जत 6100, वाळवा
2500, शिराळा 2500, मिरज 5000, विटा खानापूर 6250, आटपाडी 15,000, तासगाव 6245, कवठेमहांकाळ 2500, कडेगाव 5750, पलूस 2500 एकूण
5435 किलो.
No comments:
Post a Comment