जत,(प्रतिनिधी)-
महावितरण
कंपनीच्या गलथान कारभारामुळे मोटेवाडी (आसंगी तुर्क, ता. जत) येथे महाळप्पा आंबाजी कोकरे
यांचे घर गुरुवारी शॉर्टसर्किट होऊन घर जळाले. यामध्ये दोन लाखांचे
नुकसान झाले आहे. यामध्ये एक मोटरसायकल, एक सायकल; तसेच अन्नधान्य, कपडे,
भांडी, घरात ठेवलेली 50 हजार
रोख रक्कम; तसेच सबमर्सिबल मोटर जळून खाक झाली. त्यामुळे या दुष्काळात तो शेतकरी रस्त्यावर आला आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यानी केली.
No comments:
Post a Comment