मुलांच्या
भविष्यासाठीचं नियोजन बरंच गुंतागुंतीचं असतं. पण सुयोग्य नियोजन
आणि दर्जेदार विमा उत्पादनांच्या मदतीने मुलांचं भवितव्य सुरक्षीत करता येतं.
विमा कंपन्या मुलांसाठीच्या विशेष पॉलिसीज उपलब्ध करून देतात.
तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकता. गरजेप्रमाणे टर्म
विमा घेता येतो. युलिप्सचा पर्यायही आहे. पारंपरिक मनी बॅक पॉलिसी घेऊन मुलांच्या भविष्याला आकार देता येतो.
काही पालक पूर्ण विचार करून उच्च टर्म विमा पॉलिसीची निवड करतात.
यामुळे कोणत्याही प्रसंगात कुटुंबाला आर्थिक चणचण जाणवत नाही.
मुलांना डोळ्यासमोर ठेऊ न आखल्या गेलेल्या विमा पॉलिसी अनेक अर्थांनी
योग्य ठरतात.
या पॉलिसी
मुलांना विम्याचं सुरक्षा कवच देतात. शिवाय भविष्यात पैशांचा
ओघ सुरू राहील याचीही काळजी घेतली जाते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर
पुढच्या शिक्षणासाठी अधिक पैशांची गरज लागते. ही गरज अशा पॉलिसींनी
भागू शकते. मुलांसाठी पॉलिसी निवडताना काही गोष्टी लक्षात घेणं
गरजेचं असतं. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रिमियम
वेव्हर बेनिफिट’. यामुळे होतं काय की काही अप्रिय घटनेमुळे किंवा
कारणामुळे पालकांना विमा पॉलिसीचा हप्ता भरणं शक्य झालं नाही तर त्यात सवलत दिली जाते.
हप्ता भरला नाही तरी पॉलिसीचे लाभ सुरूच राहतात. पॉलिसीधारक पालकाचा मृत्यू झाला तर मुलांना एकरकमी पैसे मिळण्याची तरतूद पॉलिसीत
असायला हवी.
No comments:
Post a Comment