Sunday, December 23, 2018

उमदीत महात्मा विद्यामंदिरचे बुधवारपासून स्नेहसंमेलन

जत,(प्रतिनिधी)-

येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे 26 ते 28 डिसेंबरदरम्यान स्नेहसंमेलन, पारितोषिक व आदर्श सेवक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य श्रीशैल होर्तीकर यांनी दिली.

26 रोजी सकाळी 11 वाजता दहावी-बारावीत प्रथम क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर.सी. होर्तीकर हे राहणार असून याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूरचे हास्यसम्राट संभाजी यादव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 27 रोजी सकाळी 9.30 वाजता शाळेच्या प्रांगणात शेलापागोटे, फनी गेम्स कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी माजी जि.. सदस्य अॅड. चन्नप्पा होर्तीकर हे राहणार आहेत. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिंदे व सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सपांगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
 28 रोजी सकाळी 11 वाजता संस्थेतील आदर्श सेवकांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रसिध्द धनगरी ओव्या गायक मानसिध्द पुजारी, अपर तहसीलदार अर्चना पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सांगली जि..च्या माजी अध्यक्षा रेशम्मक्का होर्तीकर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रेवप्पण्णा लोणी हे असणार आहेत. याप्रंसंगी धारवाडचे हास्यसम्राट मल्लप्पा होंगल हे प्रमुख व्याख्याते उपस्थित राहणार आहेत. या तिन्ही दिवशी सायंकाळी विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचेही प्राचार्य होर्तीकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment