जत,(प्रतिनिधी
जत येथील दि फ्रेंडस असोशिएशन संस्थेच्यावतीने
दरवर्षी मातोश्री श्रीमती गिरेव्वाबाई बाबुराव ऐनापुरे आदर्श माता-पिता पुरस्कार दिला जातो. 1993 पासून
दिल्या जाणार्या या पुरस्काराचे यंदाचे हे 26 वे वर्ष आहे. आतापर्यंत 25 दाम्पत्यांना
आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.या वर्षी हा पुरस्कार
जत येथील सौ. सावित्री आणि शिवाप्पा धर्माण्णा बन्नेनवर यांना
देण्यात येणार आहे. गदिमा व्याख्यानमालेत (दि.24) हा गौरव करण्यात येणार आहे.
कृतार्थ आणि सार्थकी आयुष्य वेचलेल्या
दाम्पत्यांचे आयुष्य इतरांसाठी आदर्श वस्तुपाठ असतोच. शिवाय त्यांच्या सानिध्यात त्यांच्या मुलांची जडणघडणदेखील
तितकीच मूल्याधारित असते. अनंत अडचणी असताना आदर्श जीवन जगण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्यासारखी असते. निर्मख भावना नजरेसमोर ठेवून सरळ्पणा, शिस्तबद्ध जीवन, अखंड व्यासंग आणि भक्तीभावना आयुष्य कृतार्थ करतात. आपल्या जगण्याने इतरांना मार्गदर्शक ठरणारी आयुष्ये ही फार कमी असतात. त्यातलेच एक दाम्पत्य म्हणजे सावित्री आणि शिवाप्पा बन्नेनवर होत.
शिवाप्पा बन्नेनवर सेवानिवृत्त वरिष्ठ
मुख्याध्यापक आहेत. त्यांनी आपल्या शिक्षक
सेवा काळात निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य केले. भौतिक साधन-सुविधांचा अभाव असतानाही खेड्यापाड्यातील गरिबांच्या मुलांना उत्तम शिक्षण
मिळावे, असा त्यांचा अट्टाहास होता. आज
त्यांचे विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. स्वत:च्या कुटुबापेक्षा मुलांना स्थैर्य कसे प्राप्त होईल,याकडे त्यांचा कटाक्ष असे. शिष्यवृत्ती, स्काऊट-गाईड या क्षेत्रातदेखील त्यांनी उल्लेखनिय कार्य
केले आहे. जत तालुक्यातल्या सिंदूर, अंकलगी,
मेंढिगिरी, मुचंडी, बालगाव,
उमराणी अशा दुर्गम भागात काम केले आहे.
सावित्री आणि शिवाप्पा या दाम्पत्याला
तीन मुले आणि एक मुलगी आहे. चारही मुले उच्चशिक्षित
आणि सुसंस्कृत आहेत. थोरला मुलगा राजकुमार सिव्हिल इंजिनिअर असून
ते सध्या बंगळुरू येथे स्थायिक आहेत. दुसरे अशोक हेदेखील सिव्हिल
इंजिनिअर आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य कौतुकास्पद
आहे. यांच्या पत्नी जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आहेत.
तिसरे चिरंजीव डॉ. अप्पासाहेब एम.सी.ए., एम.बी.ए.पी.एच.डी प्राप्त आहेत. ते प्लेसमेंट अधिकारी म्हणून कार्यरत
आहेत. कन्या शारदा मायाप्पा वाघमोडे याही वृत्तपत्रविद्या पदवी
प्राप्त आहेत. सर्व मुले आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वान बनली
आहेत. अत्यंत समाधानी, सुखी कुटुंब म्हणून
यांचा लौकिक आहे. अशा या इतरांना आदर्श, मार्गदर्शक ठरणार्या दाम्पत्यांना गिरेव्वाबाई ऐनापुरे
आदर्श माता-पिता पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. हा सोहळा सोमवारी दि.24 रोजी होत आहे.
No comments:
Post a Comment