जत,(प्रतिनिधी)-
अनाधिकृट गौणखनिज उत्खनन आणि त्याची
वाहतूक रोखण्यासाठी संख अप्पर कार्यालयाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. यात अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असताना तीन ट्रॅक्टर
पकडण्यात आले. त्यांच्यावर नवीन अधिनियमानुसार चार लाखांवर दंड
ठोठावण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 20 तारखेला संख येथील हणमंत तुकाराम लोहार यांचा ट्रॅक्टर
वाळू वाहतूक करीत असताना धडक मोहिमेच्या पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी या ट्रॅक्टरवर एक लाख 49 हजार 898 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर
21 तारखेला सोनलगी येथील बोर नदीच्या पात्रात तसेच उमदी येथील बोर नदीच्या
पात्रातून अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करीत असताना दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले.
यावेळी त्यांच्यावर दोन लाख 63 हजार
267 रुपये दंड आकारण्यात आला. या तीनही कारवाया
उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संख अप्पर तहसीलदार डॉ.
अर्चना पाटील यांच्या पथकाने केल्या आहेत. या कारवाईत
तलाठी विशाल उदगिरे, बाळासाहेब जगताप, नितीन
कुंभार, गणेश पवार, विलास चव्हाण,
दुष्यंत पाटील, कोतवाल औदुंबर चव्हाण आणि एएसआय
श्री कोळी यांनी सहभाग घेतला.

No comments:
Post a Comment