विविधतेने नटलेल्या भारतीय खाऊगल्लीत खाद्यसंस्कृतीच्या
अप्रतिम मेळाचे प्रकार आपण पाहतो आहे. पण प्रत्येक प्रांतात,
धर्मात दिवसाची सुरुवात ‘चहा’ च्या ‘एकतेचा प्याला’ने होते.
तर जाणून घेऊया या चाहाच्या प्यालाला! भारत आणि
चहाचा मेळ इंग्रजकाळात झाला. प्रवासादरम्यान आसाममधील स्थानिकपेयाने
त्यावेळच्या लॉर्ड वैटिकचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी भारतात
चहाची परंपरा रुजवणे त्याचे उत्पादन करण्याकरिता 1934 मध्ये एका
समितीचे गठण केले गेले. यानंतर 1935 मध्ये
आसाममध्ये चहाचे बाग लावले गेले आणि भारत चहाचा उपभोगता व उत्पादकता म्हणून पुढे आला.
सन 350 मध्ये सर्वप्रथम ‘चहा’ पिण्याच्या परंपरेचा उल्लेख मिळतो. तो चिनमध्ये त्यानतंर 1610 मध्ये डच व्यापारी चीनमधून
‘चहा’ युरोपला घेऊन गेले आणि हळूहळू चहा संपूर्ण
जगाचे आवडते पेय बनले. जगाच्या पातळीवर भारत चहाचे उत्पादन करणार्या दुसर्या क्रमांकाचा देश आहे. भारतात विभिन्न क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारच्या जातीच्या चहाची शेती केली जाते.
देशातील विविध क्षेत्रांत चहाची शेती विभिन्न वातावरणात होत असल्याने
त्याच्या गुणवत्तेत फरक दिसून येतो. उत्तर भारत कांगडा,
कोसाती, दक्षिण भारतात द्रवनकोर, नीलगिरी या पठारी क्षेत्रात, तर उत्तरपूर्व भारतात दार्जलिंग,
आसाममध्ये चहाची शेती केली जाते. तसेच दक्षिण भारतातील
चहाचे गुण हे श्रीलंकामध्ये उगवणार्या चहाप्रमाणे आहे.
तर दार्जिलिंग तसेच त्या लगतच्या भागातील चहाची पोत जगात श्रेष्ठ मानल्या
जाते. चहा तयार करण्याच्या पद्धतीत आपल्याला पारंपरिक पद्धती
व स्थानिक चव आपल्याला दिसून येते
No comments:
Post a Comment