2000 ते 4500 रुपयांची सूट
सांगली,(प्रतिनिधी)-
ऑनलाइन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टने
आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा बंपर सेल आणला आहे. हिवाळी हंगामाच्या
पार्श्वभूमीवर कंपनीने हा सेल आणला आहे. 29 डिसेंबरपर्यंत हा सेल असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर भरघोस सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टने या सेलमध्ये स्मार्टफोनवर एक्स्चेंज ऑफरची सोय दिली आहे.
या सेलमध्ये अॅपलच्या आयफोन एक्सआर
59,600 रुपये तर 46,700 रुपयांमध्ये गुगल पिक्सेल-3
मिळणार आहेत.आयफोन एक्सआर : अॅपलचा लेटेस्ट मॉडेल आयफोन एक्सआरवर सध्या 2,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 256 जीबीचा हा स्मार्टफोन 74,900 रुपयांना खरेदी करता येणार आहे. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 76,900 रुपये आहे. याशिवाय 128 जीबीचा मॉडेल 64,600 रुपयांना खरेदी करता येईल. तर 59,600 रुपयांना 64 जीबीचा मॉडेल खरेदी करता येईल.
गुगल पिक्सेल-3 : या सेलमध्ये गुगल पिक्सेल-3वर सध्या 4,500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 128 जीबीचा गुगल पिक्सेल-3 आता 75,500 रुपयांना खरेदी करता येणार आहे. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 80,000 रुपये आहे. तर 64 जीबीचा मॉडेल 66,500 रुपयांना मिळणार आहे.
गुगल पिक्सेल-3 एक्सएल : 128 जीबीचा गुगल पिक्सेल-3 एक्सएलची मूळ किंमत 92,000 रुपये. पण फ्लिपकार्ट आपल्याला 87,500 रुपयांना मिळणार आहे. तर 64 जीबीचा मॉडेल 78,500 रुपयांना मिळणार आहे.
No comments:
Post a Comment