Monday, December 24, 2018

सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी हाजीसाहेब मुजावर

जत,( प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या (फेडरेशन) जिल्हाध्यक्षपदी हाजीसाहेब माैला मुजावर यांची निवड करण्यात आली.  महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे  अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी शिक्षक मेळाव्यात ही घोषणा केली.  यावेळी मावळते अध्यक्ष एन. व्ही. बुवा यांना 'जीवनगाैरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

संघाचा स्नेहमेळावा जत येथील श्री रामराव विद्यामंदिर येथे आयोजन करण्यात आला होता. मेळाव्यास अध्यक्ष कानडे,  राज्य शिक्षण महामंडळ,  सल्लागार  बी. डी. पाटील, व्ही. डी. साठे,  राज्य शिक्षण महामंडळाचे पुणे विभाग संघटक व्ही.डी. साठे,कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, अध्यक्ष बी. एस. खामकर, कार्यवाह सुरेश खोत , डॉ. राजेंद्र जेऊर हे उपस्थित होते.
यावेळी संघाच्या  कार्यकारी अध्यक्ष हाजीसाहेब माैला मुजावर यांची जिल्हाध्यपदी निवड करण्यात आली.  प्रदेशाध्यक्ष कानडे यांच्याहस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.  यावेळी मावळते अध्यक्ष एन. व्ही. बुवा यांना 'जीवनगाैरव' पुरस्कार देऊन सपत्निक सन्मान करण्यात आला.
राज्याध्यक्ष कानडे यांनी शिक्षकांचे प्रश्न व शासनाची भूमिका"या विषयावर मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment