Sunday, December 23, 2018

जत तालुक्यातील 15 जण हद्दपार


जत,(प्रतिनिधी)-
सराईत गुन्हेगार आणि मटका जुगाराचे अड्डे चालवणार्यांना हद्दपार करण्याची कारवाई सुरुच असून शनिवारी जत तालुक्यातील तब्बल 15 जणांना हद्दपार करण्यात आले. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यातून संबधितांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे

जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकांनी वारंवार एकाच पध्दतीचे गुन्हे करणार्यांवर हद्दपारीची कारवाई करावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिला होता. अधीक्षक शर्मा यांनी संबधित सर्वांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. परंतु त्यांच्यात कोणतीही सुधारणा होण्याची लक्षणे दिसत नसल्याने त्यांना दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येत असल्याचा निर्णय दिला. जत मधील पहिल्या टोळीतील गौतम रोचंद्र एवळे( वय 35), फिरोज महमद जमादार (वय 34), संतोष आप्पासो नागराळे (वय 35), मधुकर विठ्ठल शेडबाळे (वय 40), बाळासाहेब गणपती कांबळे (वय 47), सुनिल कन्नाप्पा पाथरुट (वय 43), विनोद दत्ता जाधव (वय 32) आदींचा समावेश असून या टोळीवर 2004 पासून मटका जुगार, मारामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. जत मधील दुसर्या टोळीत श्रावण बाबु पाथरुट (वय 49), मलकाप्पा बसगोंडा शेगुणशे (वय 62), नागेश शिवाजी बुवा (वय 32), मोसीन सलीम शेख ( वय 27), जैनुद्दीन शेख (वय 65), महेश सुरेश शिंदे (वय 27), शिवदास कृष्णा पाथरुट (वय 50), विशाल तुकाराम कांबळे (वय 30) आदींचा समावेश असून ही टोळी सरकारी कामात अडथळा करण्यात , जुगार अड्डे चालविण्यात गेल्या तीन वर्षांपासून आघाडीवर होती.

No comments:

Post a Comment