Thursday, December 27, 2018

विराटने मोडला द्रविडचा 16 वर्षे जुना विक्रम

जत,(प्रतिनिधी)-
 टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटीत राहुल द्रविडचा एक विक्रम मोडीत काढला. आपल्या खेळीचे रुपांतर शतकी खेळीत करण्यात अपयश आले असले तरी त्याने परदेशात एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. या वर्षात विराटने आतापर्यंत 1138 धावांची खेळी केली.

कोहलीची शतकाकडे वाटचाल सुरु असताना तो 82 धावांवर बाद झाला. विराटने टीम इंडियाचाद वॉलअसलेल्या द्रविडचा 16 वर्षे जुना विक्रम मोडला. द्रविडने एका वर्षात परदेशी भूमीवर 2002 मध्ये 1137 धावा केल्या होत्या. तर, विराटने हा विक्रम मोडीत काढताना 11 कसोटी सामन्यातील 21 डावात 1138 धावा केल्या. राहुल द्रविडपेक्षा विराटने अवघी एकच धाव अधिक केली असली तरी त्याला आणखी एका डावात फलंदाजी करण्याची संधी आहे.
द्रविडने 2002 मध्ये सर्वाधिक धावा करताना 19 वर्ष जुना मोहिंदर अमरनाथ यांचा विक्रम मोडला होता. मोहिंदर अमरनाथ यांनी 1983 मध्ये 1065 धावा केल्या होत्या.

No comments:

Post a Comment