Saturday, December 22, 2018

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली, (प्रतिनिधी) -
राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 12.50 वा. हेलिकॉप्टरने नागज हेलिपॅड, ता. कवठेमहाकाळ जि. सांगली येथे आगमन. दुपारी 1. वा. राष्ट्रीय क्र. 166 वरील सांगली-सोलापूर मार्गावरील सांगली-बोरगाव-वाटंबरे- मंगळवेढा-सोलापूर मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा कोनशिला अनावरण समारंभास उपस्थिती. स्थळ - नागज, ता. कवठेमहाकाळ. दुपारी 2.15 वा. वाहनाने नागज हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.25 वा. नागज हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 2.30 वा. हेलिकॉप्टरने मौजे रेड, ता. शिराळा जि. सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2.50 वा. रेड हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 2.55 वा. वाहनाने मौजे रेड (सह्याद्री पब्लिक स्कूलजवळ) कडे प्रयाण. दुपारी 3 वा. मौजे रेड (सह्याद्री पब्लिक स्कूलजवळ) येथे आगमन व वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन कामाचा शुभारंभ व शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 4.10 वा. वाहनाने रेड हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 4.15 वा. रेड हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 4.20 वा. हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment