Tuesday, December 25, 2018

दुष्काळग्रस्त गावातील शेतीपंपाचे वीज बिल माफ करा: संजय तेली


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात दुष्काळाची स्थिती भयानक झाली असून दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आणि शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी दुष्काळग्रस्त गावातील शेतीपंपाचे वीज बिल शासनाने माफ करावे, अशी मागणी उमदी (ता. जत) येथील संजय तेली यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जत हा सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. वर्षभर तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. खरीप व रब्बी हंगाम वाया गेले असून शासनाच्या शेतातील  सध्या गेले वर्षभर बंद आहेत. त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करत येथील शेतकरी या तालुक्यात संघर्ष करत असताना निसर्गानेही या शेतकर्याला साथ दिली नाही. त्यामुळे यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भीषण दुष्काळ पडला असून शेतकर्यांना पन्नास हजार रुपयांची जनावरे पाच हजार रुपयांना विकण्याची पाळी आली आहे.
अनेक शेतकरी आपली जनावरे कर्नाटकातील पै-पाहुणा कडे पाठवीत आहेत. खरीप व रब्बी चे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकर्यांचे प्रचंड हाल होत असून शेतातील मोटारीचे भरमसाठ बिले आले आहेत. ही बिले तातडीने शासनाने माफ करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. तेली यांनी केली.

No comments:

Post a Comment