ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमाला पुष्प पहिले
जत,(प्रतिनिधी)-
शिवाजी महाराजांच्या काळात एक आण्याचाही भ्रष्टाचार नव्हता. स्त्रियांवर अत्याचार करणार्यांचे हात कलम केले जायचे. अशा न्यायकारभाराची आज गरज असल्याचे प्रतिपादन खंडू डोईफोडे (बार्शी) यांनी जत येथील श्री. ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना केले.
जत येथील रामराव विद्यामंदिर हायस्कूल येथे सालाबादप्रमाणे श्री. ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. यंदाचे वर्षे 24 वे वर्ष आहे. यावेळी बोलताना श्री.डोईफोडे म्हणाले, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविला. त्यांना जर आणखी दहा वर्षे आयुष्य मिळाले असते तर दुसर्या कुणालाही राज्य करता आले नसते. त्यांच्या काळात गडांची उभारणी झाली. आज तेच त्यांच्या गाथेची साक्ष देतात. आज गड जपले पाहिजेत. युद्धात मारले गेलेल्या मावळ्यांच्या कुटुंबियांना तनखा दिली जात असे. सर्व बाजूंनी असा आदर्श कारभार होता. याचा आदर्श घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करीत राहिलो तर देश लवकरच महासत्ता झाल्याचे पाहायला मिळेल.
यावेळी आमदार विलासराव जगताप, संभाजी सरक, एन.एम.सूर्यवंशी, दीपक शिंदे, पापा कुंभार, एम.बी कोहळी,प्रमोद पोतनीस, सुभाष बालगावकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment