विजयवाडा-
राज्य
सरकारच्यावतीने दोन वा दोनहून अधिक अपत्यांना जन्म देणार्या
जोडप्यांना इन्सेन्टिव देण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
यांनी केली आहे. त्यामुळे तरुण जोडप्यांनी दोन वा दोनपेक्षा अधिक
अपत्य होऊ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच, दोन पेक्षा अधिक
अपत्य असणार्या उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही,
हा नियम रद्द केला असल्याचे म्हटले आहे. चंद्राबाबू
नायडू म्हणाले की, राज्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत
आहे. मागील 10 वर्षांत लोकसंख्या
1.6 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे लोकसंख्या
वाढीचा दर कायम ठेवण्याची गरज आहे. परिणामी अधिकाधिक अपत्यांना
जन्म देण्यात यावा. अशीच परिस्थिती राहिल्यास राज्यात पुढील दोन
दशकांत खाणारे अधिक आणि काम करणारे कमी असतील. राज्यातील लोकसंख्येतील
50 टक्के जनता सध्या तरुण आहे. राज्याला तरुण ठेवण्यासाठी
जन्मदर वाढवणे गरजेचे असून, आंध्रातील बालमृत्यू दरही घसरला असल्याचे
चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment