सांगली,(प्रतिनिधी)-
अन्न व
औषध प्रशासनाने आस्थापनेत त्रुटी आढळलेल्या 11 ठिकाणी कारवाई
करून 54 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला
आहे. दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांचा
समावेश आहे. सुरुवातीच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याची
संधी दिल्यानंतरही काही आस्थापनांनी त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरुध्द तडजोड प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाने नोंदणीकृत हॉटेल्स, दुकाने आणि इतर आस्थापनांची काही दिवसांपूर्वी तपासणी केली होती. त्यावेळी स्वच्छतेचा अभाव आढळून आला. तसेच काही ठिकाणी
अन्नपदार्थ हे अस्वच्छ कागदात बांधून दिले जात असल्याचे समोर आले होते. त्यांच्याविरुध्द तडजोड प्रकरणे दाखल करण्यात आली होती. संबंधित प्रकरणाची सुनावणी दोन दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर अकराजणांना दंड ठोठावण्यात आला.
राजेश कृष्णाप्पा पुजारी (महाराष्ट्र नाष्टा सेंटर, तृप्ती हॉटेलसमोर गावभाग,
सांगली) यांना 7 हजार
500 रुपयांचा दंड सुनावण्यात आला. संजीव यल्लू
मुल्लया (प्रसाद नाष्टा सेंटर, गावभाग)
यांना 10 हजार, मकसूल अब्दुलसमद
काझी (इंडिया स्वीट मार्ट, स्टेशन चौक सांगली)
यांना 4 हजार रुपये, भालचंद्र
धोंडिराम शेळके (मीना जनरल स्टोअर्स, डॉ.
आंबेडकर नगर समोर, नवीन धनगर गल्ली, सांगली) यांना 5 हजार रुपये,
विलास राजाराम भोसले (हिराई किराणा स्टोअर्स,
दुधोंडी, ता. पलूस)
यांना 2 हजार रुपये, अनिल
आकाराम गायकवाड (अशोक नाष्टा सेंटर, स्टेशन
रोड, मिरज) यांना 10 हजार रुपये, शशिकांत बाळासाहेब पुंडे (शशिकांत टी हाऊस, गुड्डापूर) यांना
4 हजार रुपये, बसवराज होनकरप्पा बिराजदार
(गुड्डापूर) यांना 4 हजार
रुपये, आर. व्ही. चव्हाण (केदार सोडा सेंटर, जाधववाडी
रोड, कवठेमहांकाळ) यांना 2 हजार रुपये आणि मानसिंग पंढरीनाथ पाटील (राज सोडा सेंटर,
कवठेमहांकाळ) यांना 2 हजार
रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले
यांनी दिली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी कोळी, आर. एल. महाजन, श्रीमती एस. व्ही. हिरेमठ,
एस. एस. हाक्के यांनी ही
कामगिरी केली आहे.
No comments:
Post a Comment