Saturday, December 29, 2018

एके काळी ‘रिजेक्टेड’ असल्यासारखे वाटायचे : टायगर


टायगर श्रॉफहिरोपंतीमधून आला त्यावेळी त्याचा अगदीच मऊ अवतार व सुमार अभिनय पाहून आता याचे कसे व्हायचे, असा प्रश्न जॅकी श्रॉफपासून सर्वांनाच पडला! मात्र टायगरने आपल्या उणिवा दूर करून नव्या दमाने वाटचाल सुरू ठेवली आणि आता तो हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झाला आहे. यावर्षी त्याच्याबागी-2’ने बंपर यश मिळवले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सुमारे 161 कोटी रुपयांची कमाई केली. आताबागी-3’चीही घोषणा करण्यात आली आहे. आता हे यश चाखत असलेल्या टायगरला एके काळीरिजेक्टेडअसल्यासारखे वाटत होते. याच भावनेला त्याने आपली ताकद बनवली, असे त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे

टायगर श्रॉफचे पिळदार शरीर व मार्शल आर्टमधील नैपुण्य त्याला इतरांपेक्षा वेगळे करते. हाणामारीबरोबरच तो हृतिक रोशनप्रमाणेच अतिशय सफाईदारपणे नृत्यही करू शकतो, ही जमेची बाजू. त्यामुळे आता करण जोहरच्यास्टुडंट ऑफ द इअर-2’ मध्येही तो मुख्य भूमिकेत आहे. त्याने सांगितले, हे वर्ष माझ्यासाठी अतिशय चांगले गेले. करिअर आणि वैयक्तिक जीवन या दोन्ही पातळींवर मला बरेच काही मिळाले. यावर्षी मिळालेल्या यशाने मी अतिशय आनंदी आहे.

No comments:

Post a Comment