सांगली,(प्रतिनिधी)-
आगामी
लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सांगलीतील भारतीय
जनता पक्षाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना निमंत्रण दिले आहे.
त्यांनीही यासाठी हिरवा कंदील दर्शविला आहे. सांगलीतील
वारणाली रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन 24 जानेवारी रोजी शहा यांच्याहस्ते
करण्यात येणार असल्याची माहिती भाजप कार्यालयातून देण्यात आली.
सांगली आणि तासगावात भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन
सुरू आहे.
वारणाली येथे साडे चार कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येत आहे.
याचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या
24 जानेवारीपर्यंत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
या कामाचे उद्घाटन केल्यानंतर शहांच्या हस्ते येथील महापालिकेच्या नगरसेवकांचा
सत्कार आणि शहा यांचा नागरी सत्कार असे दोन कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर तासगाव येथेही काही कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
त्याचे नियोजन अद्याप झालेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या
दृष्टीने सांगली जिल्हा भाजपने तयारी सुरू केली आहे. विधानसभेच्या
दृष्टीने आगामी निवडणुकांसाठीच भाजपने अमित शहा यांना आणून शक्तिप्रदर्शन करण्याची
तयारी चालविली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री
नितीन गडकरी यांच्याहस्ते महामार्गांचे भूमिपूजन करून त्यांनी वातावरण निर्मिती केली
होती. आता त्यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्षांनाच निमंत्रित केले
आहे.
No comments:
Post a Comment