Friday, December 21, 2018

(आरोग्य) रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे पाच फायदे


लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत, याची आपल्याला कल्पना आहे. आयुर्वेदात तर लसणाला औषध मानले गेले आहे. असं सांगितलं जातं की, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात लसूण आपल्या आहारात असायला हवं. आहारात त्याचा समावेश असायलाच हवा. पण सकाळी रिकाम्या पोटी लसणाचे सेवन अनेक प्रकारे फायद्याचे आहे, असे सांगितलं जातं. काय आहेत,फायदे याची माहिती घेऊ या.

1)   हाय बीपीपासून सुटका-
लसूण खाल्ल्याने हाय बीपीपासून आराम मिळतो. वास्तविक लसूण ब्लड सर्क्युलेशन कंट्रोल करण्याच्या कामी खूपच उपयोगाचा आहे. हाय बीपीने ग्रस्त असलेल्या लोकांना रोज लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.
2)   पोटाच्या आजाराच्या समस्यांनापासून विशेषत: डायरिया आणि कफ यांच्यापासून सुटका मिळते. यासाठी लसूण मोठा गुणकारी आहे. पाणी उकळून त्यात लसणाच्या पाकळ्या टाकून त्या पाकळ्या रिकाम्या पोटी खाल्ल्यास चांगला उपयोग होतो.
3)   हृदय राहील तंदुरुस्त
लसूण हृदयाच्या संबंधित असलेल्या समस्या दूर करण्यास मदत करतो. लसूण खाल्ल्याने रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे हृदयविकार येण्याचा धोका कमी होतो.
4)   डायजेशन होईल चांगले
रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने किंवा चावल्याने डायजेशन चांगले राहते. आणि भूकदेखील वाढते.
5)   सर्दी-खोकल्यापासून आराम
लसूण खाल्ल्याने सर्दी,खोकला, अस्थमा, निमोनिया, ब्रोंकाइटिसच्या उपचारात फायद्याचे आहे.



No comments:

Post a Comment