Thursday, December 27, 2018

मनाला चेतना देणारा शब्द: आठवण


आठवणएक अतिशय साधा शब्द. मनाच्या खोल अंतरंगातून उमटणारा शब्दआठवण!’ प्रत्येकजण वापरत असतो असा प्रचलित शब्द आठवण. प्रत्येक श्वासागणिक मानवी मनाला चेतना देणारा शब्द आठवण. आठवणीत माणूस कायम रमत असतो. असा एक ही क्षण जात नाही, ज्याने माणसाला कशाची आठवण येणार नाही अथवा होणार नाही. प्रत्येक आठवणीत माणूस जगत असतो. आठवणी या माणसाला कायम वेगळ्या विश्वात घेऊन जात असतात. या आठवणीच त्याच्या सदैव सोबत करत असतात.

कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. येणार्या काही दिवसांत नवं वर्ष सुरू होईल. नवे वर्ष पुन्हा नव्या आठवणींसह सुरू होईल. पण जितके वर्षे मागे सरले तरी आठवणी या सदैव सोबत करत असतात. आठवणींची साठवण आपल्या मनात आपोआप होत असते. मनाला त्यासाठी काही मर्यादा नसतेच.नको असलेल्या हव्या असलेल्या सगळ्या आठवणींची साठवण! साठवण म्हटलं की, प्रत्येक गोष्ट डोळ्यांसमोर येते. काही घटना या कायम आठवणीत असतात, त्या साठवून ठेवू शकत नाही.
अनेक वेळा मनात सुंदर कल्पना येतात, त्या डायरीत लिहून ठेवण्याची आठवण असते पण जेव्हा त्या लिहायला जातो, तेव्हा त्याची साठवण करू शकत नाही, हेच खरं! आठवणी या माणसाला आत्मिक समाधान देत असतात. कायम वाईट आठवणी डिलीट करून चांगल्या आठवणी रिफ्रेश कराव्यात. आठवणी या लिहून ठेवू शकत नाही. त्या मनाच्या एका कोपर्यात सदैव असतात. कुणाची आठवण आली की त्या अलगद बाहेर येऊन त्याचा सुगंध दरवळून वातावरण आल्हाददायक करत असतात. माणूस हा एकमेव प्राणी आहे की जो आठवणींची सोबत करत असतो. येणारा दिवस कधीही आठवणी शिवाय जात नाही. दिवस गेला तरी आठवण जाता जात नाही.. अशा नव्या-जुन्या आठवणी सोबत घेऊन येणार्या नवीन वर्षाचे स्वागत करूया!

No comments:

Post a Comment