Friday, January 24, 2020

परवीन बाबीच्या आयुष्याची शोकांतिका

परवीन बाबी हे नाव समोर उच्चारले की आपल्यासमोर येतो तिचा ग्लॅमरस अंदाज. बॉलिवूडची दिवा असं तिला म्हटलं जायचं. तिचं 'जवानी जानेमन हे गाणं' असो किंवा 'प्यार करनेवाले प्यार करते हैं शान से' हे गाणं असो किंवा अगदी खुद्दार सिनेमातलं 'मच गया शोर सारी नगरी रे' असो आजही तिची गाणी लोकांच्या लक्षात आहेत. मनावर रुंजी घालत आहेत. मात्र या परवीन बाबीचा मृत्यू झाला ते तीन दिवसांनी समजलं होतं. तिला जाऊन १५ वर्षे झाली आहेत. मात्र तिच्या अनेक चित्रपटांमुळे आणि एकाहून एक सरस गाण्यांमुळे ती आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहे आणि यापुढेही राहिल.

...आणि लग्नात नीतू आणि ऋषी पडले बेशुद्ध

बॉलिवूडमधील 'ऑल टाईम हीट' जोडी म्हणजे अभिनेता ऋषी कपूर आणि नितू कपूर. 'जहरीला इन्सान' या चित्रपटाच्या सेटवर ओळख झालेल्या या जोडीच्या लग्नाला आता जवळपास ४0 वर्ष झाली आहे. मात्र त्यांचं एकमेकांप्रतीचं प्रेम, आदर यत्किंचितही कमी झालेला नाही. 'जहरीला इन्सान' या चित्रपटाच्याच वेळी या दोघांमधलं प्रेम खुललं आणि १९८0 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. परंतु ऐन लग्नात नितू आणि ऋषी कपूर बेशुद्ध पडले होते. या मागचं कारण नितू कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

वसंत पंचमीचे महत्त्व

वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. भारतात साधारणत: मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणार्‍या संस्थांमध्ये, विद्येची देवता-सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो.

Thursday, January 23, 2020

आचार्य चाणक्य देतात सुखी जीवनाचा मंत्र

आचार्य चाणक्य एक महान नीतिकार होते. त्यांनी सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी विविध नीती सांगितल्या आहेत. आजच्या काळातही या नीतींचे पालन केल्यास व्यक्ती अडचणींपासून दूर राहू शकतो. चाणक्याच्या या दोह्यामधून समजू शकते की, व्यक्तीने कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहावे आणि कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहू नये.

Wednesday, January 22, 2020

भारतातील 231 शहरे सर्वात प्रदूषित

भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे. झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.

कसे फेडायचे कर्ज?


गृहकर्ज, वाहनकर्ज आणि क्रेडिट कार्ड या सगळ्यांचे हप्ते एकाच वेळी चुकविण्याची वेळ अनेकांवर येते. अशा वेळी आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडतं. खर्चाचा ताळमेळ बसवता बसवता नाकी नऊ येतात. हप्ते वेळेत न भरल्यास सबल स्कोअरही खराब होतो. अशा परिस्थितीत अर्थनियोजन कसे करावे, यासाठीच्या काही टिप्स..
कर्जफेडीचे नियोजन कसे असावे हे तपासण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. मासिक उत्पन्न ७५,000 रुपये असलेल्या व्यक्तीचा मासिक खर्च ४0 हजार रुपये आहे. उर्वरित ३५ हजार रुपयांमध्ये या व्यक्तीला गृहकर्ज, वाहनकर्ज आणि क्रेडिट कार्डचे हप्ते भरावे लागतात. या व्यक्तीकडे २७ लाख ९३ हजार रुपयांची संपत्ती आहे. 

या आहेत भारतातील प्रभावशाली महिला

भारतीय महिला या जगभरात नेहमीच त्यांचे शांत, संयमी वागणे, लांब केस, साडी, दागिने, घरात आपल्या कुटुंबाची काळजी वाहणार्‍या म्हणून ओळखल्या जातात. परंतु प्रत्येक पिढी दरपिढी काही महिला नेहमीची परंपरा मोडीत काढून स्वत:ला सशक्त, स्वतंत्र आणि विविध रुपात वावरताना दिसतात. झाशीची राणी लक्ष्मीबाईने रणात लढताना आपले प्राण अर्पण केले. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, मानवतेचे प्रतीक मदर तेरेसा ही त्यातलीच काही उदाहरणे आहेत. अशाच काही प्रभावशाली महिलांची ही ओळख.. 

रुसलेल्या प्रेयसीची समजूत कशी काढाल?


प्रेमात मन फुलपाखरू होतं..जीवलगाच्या सभोवताल सारखं उंडाळत राहतं..चुकूनही जोडीदाराचे मन दुखू नये म्हणून फुलासारखा त्याला जपत राहतं..पण, एक क्षण असा येतो जेव्हा आपल्याही नकळत आपला एखादा शब्द आपल्या आवडत्या व्यक्तीच्या थेट काळजाला भिडतो आणि मग सुरू होतो जीवघेणा अबोला. हा अबोला जसाजसा लांबत जातो तशीतशी जीवाची घालमेलही वाढत जाते. प्रेमातला गोडवा अनुभवायचा असेल तर हा अबोला लवकर संपायला हवा. काय विचारताय..कसा संपवायचा? वाचा मग खाली..

Friday, January 17, 2020

संस्कृतचे गाढे अभ्यासक:डॉ. आ. ह. साळुंखे


ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांना सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्था यांच्या वतीने दिले जाणारा पाचवा अश्‍वघोष पुरस्कार जाहीर झाला. सातारा येथे येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार्‍या धम्म महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खाडेवाडी या लहानशा गावी एका शेतकर्‍याच्या कुटुंबात १४ ऑक्टोबर १९४३ रोजी झाला. संस्कृत विषयात पहिल्या वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून घेतली.

शब्दांचा जादूगार:जावेद अख्तर

हिंदी चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या सुवर्णमय इतिहासामध्ये निर्माते, दिग्दर्शकांपासून ते अगदी कलाकार, संगीतकारांच्या जोड्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान दिले आहे. चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्येक कलाकाराचे योगदान तसे फारच महत्त्वाचे आहे यात शंकाच नाही. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर.

Tuesday, January 14, 2020

(माहित आहे का?) अक्षय करतोय विशी-तिशीतल्या अभिनेत्रींशी रोमांस


बॉलिवूडमध्ये स्टार अभिनेते वय झालं तरी नायक म्हणून काम करत आहेत. त्यांचा हा रोमांस अगदी 23 ते 27 वय वर्षे असलेल्या अभिनेत्रींशी चाललेला असतो. आज शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, अमिर खान या कलाकारांनी पन्नाशी ओलांडली आहे,पण ते आजही विशी-तिशीतल्या अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमांस करताना पाहायला मिळतात. यापूर्वीही वयाचे अंतर असलेल्या जोडींचे चित्रपट आले. प्रेक्षकांनी किंवा चाहत्यांनी काहींना स्वीकारले काहींना नाही. पण हा ट्रेंड चालतच आला आहे. आज अक्षयकुमार 52 वर्षांचा आहे. पण अजूनही फिट आहे. त्यामेळे तोही विशी-तिशीतल्या अभिनेत्रींसोबत रोमांस करताना पाहायला मिळणार आहे. सुपर 30 आणि बाटला हाऊस फेम मृणाल ठाकूर ही बेलबॉटममध्ये अक्षयकुमारसोबत दिसणार आहे. मृणालचं वय 27 आहे. अक्षय आणि मृणालच्या वयात तब्बल निम्मं अंतर आहे. अक्षय आणखीही अशाच वयाच्या अभिनेत्रींसोबत आपल्याला दिसणार आहे

अभिनेत्रीसुद्धा स्वत:च्या हिंमतीवर 500 कोटी कमावतील


परवा अभिनेत्री विद्या बालनची मुलाखत वाचायला मिळाली. ती सतत महिला सशक्तीकरणविषयी बोलत असते. या मुलाखतीतही तिचा विषय हाच होता. अलिकडेच ती आपल्याला मिशन मंगलमध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत अक्षयकुमार, तापसी पन्नू,नित्या मेनन, कीर्ती कुल्हारी आणि सोनाक्षी सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. ती म्हणाली की, आता फिमेल स्टार्स पहिल्यापेक्षा अधिक ताकदवान होत आहेत. येणार्या दिवसांत महिला स्टार्स आपल्या ताकदीवर 200 आणि 500  कोटीचे चित्रपट देऊ शकतील. लोकांच्या रुची बदलताहेत. काही महिला प्रधान चित्रपट रिलिज होत आहेत. आणि ते हिटही होत आहेत. अजूनही काही मोठे चित्रपट येत आहेत. हे चित्रपट नवे रिकॉर्ड रचतील, असा तिला विश्वास आहे.

इरफान खान दुसरी इनिंग खेळायला तयार


बॉलीवूडमध्ये आपल्या कसदार अभिनयाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या इरफान खानने हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. आपल्या तीन दशकाच्या फिल्मी करिअरमध्ये त्याने आतापर्यंत 50 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा जन्म 7 जानेवारी 1966 मध्ये जयपूरमध्ये झाला. अलिकडे तो कॅन्सरने ग्रस्त होता. इरफानचं स्वप्न होतं क्रिकेटपटू बनायचंं. पण झाला अभिनेता. त्याच्या करिअरचा सुवर्णकाळ सुरू असताना त्याला आजाराने ग्रासले. आता तो आपल्या करिअरची दुसरी इनिंग खेळायला सज्ज झाला आहे. इरफानने 1988 मध्ये आलेल्या सलाम बॉम्बे चित्रपटाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण त्याची ओळख 2005 मध्ये आलेल्या रोग चित्रपटाने झाली. यानंतर हासिल, लंचबॉक्स, गुंडे, हैदर, पीकू पान सिंह तोमर, करिब करीब सिंगल, मदारी यशस्वी चित्रपट आले. त्याने ज्युरासिक पार्क आणि स्पायडरमॅन या हॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.

भूमिकेसाठी अभिनेत्री करतात शरीरासोबत एक्सपेरिमेंट


बॉलिवूड कलाकार चित्रपटातल्या आपल्या भूमिकेत स्वत:ला झोकून देण्यासाठी काहीही करायला तयार असतात. अमिरखान याबाबतीत आघाडीवर आहे. पण यात महिला कलाकारही काही मागे नाहीत. यांनीही भूमिकेनुसार स्वत:मधे बदल केला आहे. या अभिनेत्री वजन वाढवतात आणि घटवतातही. यासाठी त्यांना आपल्या डायटमध्ये बदल करावा लागतो. काही अभिनेत्रींनी अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंट केल्या आहेत. आता या यादीत कृति मेननचंही नाव सामिल झालं आहे. तिला आगामी मिमि चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन वाढवायचं आहे. हा चित्रपट सरोगेसीवर आधारित आहे. स्लिम बॉडीसाठी ओळखल्या जाणार्या या अभिनेत्रीला वजन वाढवण्याबरोबरच स्वत:लाही अभिनेत्री म्हणून सिद्ध करावं लागणार आहे. अशा प्रकारे आपल्या शरीरासोबत एक्सपेरिमेंट करणार्या काही महिला कलाकारांमध्ये विद्या बालन आहे. कटरिना कैफ आहे. इतकंच काय प्रियंका चोप्रा, भूमि पेडणेकर, ऐश्वर्या रॉय, कंगना राणावत यांनाही भूमिकेसाठी स्वत:मध्ये बदल करावा लागला आहे.

Sunday, January 12, 2020

भारतात दरवर्षी पाच लाख अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू


देशात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात. या अपघातात दीड लाख लोक मरण पावतात आणि सुमारे तीन लाख लोक जखमी आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. मंत्रालयाने अनेक उपाय योजना योजूनही मृतांच्या संख्येत काहीही कमी झाली नाही, असेही त्यांनी सांगतले. नवीन मोटर वाहन कायदा लागू करुन सरकारने जनजागृती करण्याचा आणि नियमांचे पालन करण्यास भाग पडण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

बार्शीच्या संशोधकाला सीताफळाच्या नव्या जातीचे पेटंट


स्थानिक भागातील सीताफळाचे मिळणारे उत्पादन, उत्पन्नापेक्षा अधिक उत्पादन तसेच उत्पन्न देणार्‍या सीताफळाच्या एनएमके -१ गोल्डन सीताफळाच्या या नव्या जातीला केंद्र सरकारने पेटंट जाहीर केले आहे. यामुळे टिकाऊ, निर्यात योग्य सीताफळामुळे शेतकर्‍यांचा फायदा होत असल्याचा विश्‍वास व्यक्त होत आहे. बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील शेती संशोधक डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांनी सीताफळाच्या शोधून काढलेल्या या एनएमके-१ गोल्डन या जातीची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. सरकारकडून त्याची नोंदणी करण्यात आली आहे.

(माहित आहे का?) ऋत्विक लहानपणी बोलताना अडखळायचा


बॉलीवूड अभिनेता ऋत्विक रोशन याने केवळ प्रणयरम्य भूमिकाच नव्हे तर आपल्या माचोमॅन छबीनेही प्रेक्षकांना दिवाने बनवले आहे. 10 जानेवारी 1974 रोजी मुंबई येथे जन्मलेल्या ऋत्विकला अभिनय कला वारसाने मिळाली आहे. त्याचे वडिल राकेश रोशन प्रसिद्ध फिल्मकार आणि अभिनेता आहेत. त्यांच्या आजोबांनी संगीत क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. ऋत्विकने बालकलाकार म्हणून आशा, आप के दिवाने, आसपास आणि भगवान दादा सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिरोच्या भूमिकेत त्याने पहिल्यांदा 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या कहो ना प्यार है मध्ये काम केले. वडिल राकेश रोशन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला.

(माहित आहे का?) चित्रपटांसाठी अमरीश पुरीने सोडली सरकारी नोकरी


आपल्या जानदार अॅक्टिंग, दमदार आवाज आणि कुशल कार्यशैलीच्या जीवावर अमरीशपुरीने हिरो आणि व्हिलेन या दोन्ही क्षेत्रात जबरदस्त काम केले. त्यांचा जन्म 22 जून 1932 मध्ये पंजाबच्या नवांशहरमध्ये झाला होता. रंगमंचावरून चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आलेल्या अमरीशने काही स्मरणात राहणार्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. जवळपास चार दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करून आपली खास ओळख निर्माण केली.12 जानेवारी 2005 रोजी त्यांचे निधन झाले.
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अमरीश पुरी लेबर मिनिस्ट्रीमध्ये काम करत होते. त्यांनी आपला फिल्मी सफर करण्याच्या सुरुवातीला स्क्रिन टेस्ट दिली होती. आणि त्यात ते चक्क फेल झाले होते. पण ते थिएटरशी जोडून राहिले. अमरीश या दरम्यान नोकरी सोडणार होते. पण सत्यदेव दुबे यांनी त्यांना सल्ला दिला होता की, चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका मिळत नाहीत, तोपर्यंत नोकरी सोडायची नाही. शेवटी दिग्दर्शक सुखदेव यांनी त्यांना नाटकादरम्यान पाहिले आणि त्यांना आपल्या रेशमा आणि शेरा या चित्रपटासाठी साइन केले. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरसाठी शेवटी नोकरी सोडली.

Saturday, January 11, 2020

२४ तासांत २८ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

विद्यार्थ्यांवर सातत्याने वाढणारा दबाब आणि त्यातून येणार्‍या तणावामुळे विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मागील १0 वर्षात भारतात ८२ हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. देशात २0१८ या वर्षात दर दिवशी २८ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोच्या अहवालात उघड झाले आहे. एक जानेवारी २00९ ते ३१ डिसेंबर २0१८ या कालावधीत आतापयर्ंत ८१ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

रयतेचे स्वराज्य निर्मिका : राजमाता जिजाऊ

जगामध्ये दोन छत्रपती तयार करणार्‍या राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ ला झाला. जिजाऊंच्या माहेरच्या लोकांचे नाव काय? सासरच्या लोकांचे नाव काय? यापेक्षा महत्त्वाचे आहे राजमाता जिजाऊ यांनी काय कार्य केले. जिजाऊंची ख्याती जगभर कशी पसरली. मुळात जाधव घराने कणखर बाणी व विज्ञानवादी होते. म्हणून जाधव घराण्यात १२ जानेवारीला जिजाऊंचा जन्म झाला आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिजाऊंचा जन्मदिवस हा सन उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. हत्तीवरून साखर वाटण्यात आली. थोडक्यात जिजाऊंच्या जन्मानेच रयतेसोबतच ही जमीन सुद्धा धन्य झाली.

रोज सकाळी पाच गोष्टी करा,फिट राहा

प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात करतो. कोणी सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असतो तर कोणी जिमला जातो. मात्र अशी काही कामे आहेत जी प्रत्येक व्यक्तीने सकाळी करायला हवीत. या छोट्या छोट्या गोष्टी, आपण केल्या तर आपले आयुष्य बदलून जाईल. जाणून घेऊया ती ५ कामे जी प्रत्येक व्यक्तीला करायला हवीत.

Friday, January 10, 2020

संक्रांतीचे वाण

मकर संक्रांतीच्या दिवशी धनुर्मास (धुंधुरमास) संपतो. म्हणजे त्या दिवसापर्यंत तांदूळ आणि मुगडाळ यांच्या खिचडीचा नैवेद्य दाखवून सकाळी लवकर जेवण करण्याचा प्रघात आहे. संक्रांतीच्या दिवसात तीळ व गूळ यांना फार महत्त्व आहे कारण या काळात थंडी असते. त्यामुळे गूळ व तीळ यासारख्या उष्ण पदार्थाचे सेवन या काळात आरोग्यवर्धकच आहे.

मकर संक्रांतीचे महत्त्व

मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. भारतातील जवळजवळ सर्वच भागात मकर संक्रांतीचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. इंडो-आर्यन (हिंदी) भाषेनुसार यांस 'मकर संक्रांथी' असे म्हटले जाते. दक्षिणेकडील काही भागात आजही हेच नाव प्रचलित आहे. हा सण विशेषत: सूर्य देवतेशी संबंधित आहे. सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत होणारे संक्रमण यांस 'संक्रांती' असे म्हणतात तर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून 'मकर संक्रांती' असे नाव प्रचलित झाले, यानुसार सूर्याचा मकर राशीतील प्रवेश, वसंत ऋतूचे भारतातील आगमन अशा अनेक परंपरागत समजुती आणि प्रतीके हा सण साजरा करण्यामागे आहेत. ग्रेगोरिअन कॅलेंडरनुसार दरवर्षी सारख्याच तारखेस येणार्‍या काही भारतीय सणांपैकी हा एक सण आहे.

Thursday, January 9, 2020

प्रेमभंगातून रोज चार मुलांची आत्महत्या

प्रेमात अपेक्षाभंग होऊन आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कारण १८ पेक्षा कमी वयात प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केल्याच्या घटनांची संख्या हादरवणारी आहे. २0१८ मध्ये तब्बल १ हजार १३0 तरुणांनी प्रेमातील अडचणींमुळे आत्महत्या केल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
प्रेमभंगामुळे ४६६ अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केली आहे. तर याच कारणामुळे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या तब्बल ६६५ इतकी आहे. प्रेमभंगामुळे आत्महत्या केल्याच्या देशभरात ५३४२ तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. ज्यातील २0 टक्क्यांहून अधिक जण अल्पवयीन आहेत.

स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक


मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.
दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्र्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले.

Monday, January 6, 2020

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समिती सांगली जिल्हा सदस्य  सलीमभाई गवंडी,जत तालुका काॅन्ट्रॅक्टर असोशिएशन व बांधकाम कामगार संघटना, एसजी ग्रुप, अनमोल महिला ग्रुप व जत तालुका मुस्लिम समाजाच्यावतीने पञकार दिनानिमित्त जत तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

Sunday, January 5, 2020

बाळशास्त्री जांभेकर

दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे, इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्च विद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होत. १९ व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा १८३२ ते १८४६ या काळात उमटवला.

Saturday, January 4, 2020

गायक जे.एल. रानडे

सांगली शहरातील राममंदिर ते शासकीय रुणालयाच्या रस्त्यावरील हे घर आता नवा साज ल्यालं आहे. याच घरात राहिलेल्या जनार्दन लक्ष्मण ऊर्फ जे. एल. रानडे यांचा जन्म इचलकरंजीचा २७ मार्च १९०५ चा. पौराणिक कथांतील गीते म्हणणाऱ्या आपल्या जे.एल.रानडे आईकडूनच संगीताचे धडे घेतलेल्या रानडे यांना वडील गेल्यानंतर सांगलीला यावं लागलं. इथल्याच सिटी हायस्कूलात त्यांच शिक्षण झाले. ते सुरू असतानाच त्यांनी सुरवातीला मोरोबा गोंधळी आणि नंतर दि. रा. गोडबोले गुरुजींकडून संगीताचे धडे घेतले. याच काळात कृष्णाजी बल्लाळ देवल, सी क्लेमंट्स आणि भातखडे यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि नंतर नोकरीसाठी म्हणून ते अहमदनगरला गेले.