Tuesday, December 25, 2018

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सक्षम बनवणार: दिलीप पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी सोसायट्या व ग्राहक सक्षम बनविणार असून मध्यवर्ती बँकेने शेतकर्यांसाठी विविध योजना तयार केल्या असून द्राक्ष, डाळिंब कर्जमर्यादा वाढविण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. जिल्हा बँकेच्या वतीने जत ग्राहक संपर्क अभियानांतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष पाटील म्हणाले की, गेली तीन वर्षे शेतकर्यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात चांगली सेवा दिली आहे. जत तालुका हा दुष्काळी असला तरी बँकेने या मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करून शेतकर्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. बँकेची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर 2800 कोटींच्या ठेवी होत्या; मात्र त्या वाढवून आता 4070 कोटींच्या ठेवी झाल्या आहेत. कर्मचार्यांना वर्षे पगारवाढ झाली नव्हती. तातडीने अनेक सोसायट्यांना लाभांश देण्यात आला आहे. सोसायट्यांनी आता कर्जावरील व्याजाकडे लक्ष न देता वेगवेगळे उद्योगधंदे सुरू करून सोसायट्या आर्थिक सक्षम बनविण्यासाठी केला पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, बँक पारदर्शक व ग्राहकाभिमुख सुरू असून द्राक्ष, डाळिंबाच्या कर्जाची मर्यादा वाढविली आहे. आगामी कालावधीत पीक कर्जाची मर्यादा वाढताना शेतकर्यांना दिलासा देणारे निर्णय घेणार असल्याचे सांगत येते महापालिका शंभर कोटींवर जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बँकेचे संचालक विक्रम सावंत म्हणाले, जत तालुका हा दुष्काळी असून या तालुक्यात थकबाकी 70 टक्क्यांवर गेली असली तरी या तालुक्यातील सर्व शेतकरी दरवर्षी प्रामाणिकपणे बँकेचे पैसे भरतात. जिल्हा बँकेच्या तालुक्यात 25 शाखा आहेत. या शाखांतून डिपॉझिट जिल्हा बँकेला दिले असून तालुक्यात कर्जपुरवठा करून मोठा दिलासा दिला आहे. यावेळी तालुक्यातून आलेल्या अनेक सभासद सोसायटीचे संचालक, अध्यक्षांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी समर्पक उत्तर दिले. यावेळी बँकेचे संचालक विक्रम सावंत, श्रद्धा चरापलबसवराज बिराजदार, महादेव पाटील, मल्लेश कत्ती, सिद्धाप्पा शिरसाठ, उत्तमशेठ चव्हाण, बसवराज दोडमनी, बाळासाहेब जाधव, बी. एस. रामदुर्ग, राजू कोळी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment