जत,(प्रतिनिधी)-
संतपरंपरा ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे. यातील संतसाहित्य हे लोक साहित्यातील पाचवा वेद आहे, असे प्रतिपादन रामचंद्र देखणे(पुणे) यांनी जत येथे ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना केले.
जत येथील रामराव विद्यामंदिरमध्ये पार पडलेल्या श्री. ज्ञानेश्वर व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना डॉ. देखणे बोलत होते. ते म्हणाले,वेद ज्यांनी निर्माण केलेत्या परमात्म्याला आम्ही भजनाला बोलावतो, असे संत सांगतात. वैष्णव म्हणजे वारकरी. जो वारीत सहभागी होऊन सदाचाराची देवाणघेवाण करतो, तो वारकरी. या सगळ्यांचा ज्ञानेश्वर हा श्वास आहे तर तुकाराम ध्यास. आणि गाडगेबाबा त्यांचा विश्वास आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग साळुंखे यांनी केले. यावेळी सुरेश शिंदे, शशिकांत काळगी, बाबूराव कोळी, मनीष चव्हाण, चिदानंद वळसंगकर यांचा सत्कार करण्यात आला.जि.प. सदस्य स्नेहलता जाधव, नगरसेविका श्रीदेवी सगरे, विश्वानाथ शिंदे आदी उपस्थित होते. आभार अमोल कळसकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment