Saturday, December 29, 2018

मंगळवेढ्यात गीरगाय, कुक्कुट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण

मंगळवेढा,(प्रतिनिधी)-
  शासन मान्यता प्राप्त श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ यांच्यावतीने गीरगाय पालन, कुक्कुट पालन व बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षणाचे आयोजन 2 ते 4 जानेवारी दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या मुख्याधिकारी डॉ.साधना उगले यांनी दिली.
याद्वारे शेतीपूरक उद्योगांना चालना देऊन प्रगतशील करण्यासाठी तसेच  दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांसाठी, सुशिक्षित बेरोजगार महिला व पुरूष यांच्यासाठी मंगळवेढा येथील पंचायत समितीच्या पाठीमागे बचत गट इमारतमध्ये सकाळी 11 ते 1 या वेळेत प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. या तांत्रिक प्रशिक्षणामध्ये जाती, निवड व प्रजनन, गीरगाय, कुक्कुट व शेळ्यांचा आहार, गोठा व्यवस्थापन (निवारा), चारा साठवण पध्दत, आजार, उपचार व नियंत्रण, शेळ्यांचे दूध-उपयोग, या सर्वाचे अर्थशास्त्र याविषयी माहिती दिली जाणार आहे. तसेच उद्योजकीय प्रशिक्षणामध्ये प्रभावी संवाद कौशल्य, कार्पोरेट मार्केटिंग, उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, बाजारपेठ पाहाणी, विक्री कौशल्य, गीरगाय, कुक्कुट व शेळी पालन पूरक उद्योगातील संधी, शासकीय व निमशासकीय कर्ज योजना व अनुदानाची माहिती, जिल्हा उद्योग केंद्राच्या व नाबार्डच्या विविध योजनांची माहिती व प्रकल्प अहवाल तयार करणे आदी माहिती दिली जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी फक्त 30 जागाच असणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे.

No comments:

Post a Comment