जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सनमडी शाखेचे कॅशिअर बाळासाहेब कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
डीसीसी बँकेत प्रदीर्घ सेवा बाजून आज 31 डिसेंबर रोजी वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेमार्फत फेटा,हार,घालून सत्कार करण्यात आला. व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे म्हणाले, श्री. कांबळे यांनी सेवेत असताना सर्व ग्राहकांना चांगल्या सुविधा व सेवा दिली. ते एक चांगले व मनमिळाऊ अधिकारी होते. हा कार्यक्रम सनमडी येथे घेण्यात आला. यावेळी संघटनेचे पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे, राज्य उपाध्यक्ष संतोष काटे,शिक्षक भारतीचे बाळू सोलनकर, अविनाश बुद्धेवार, भिवाजी देशमुखे, लक्ष्मण खरजे,सुर्याबा राजगे आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment