जत,(प्रतिनिधी)-
बाज
(ता. जत) येथे गाडी आडवी
मारल्याने दोघांना तलवार, काठी व गजाने मारहाण करण्यात आली.
अण्णासो नाना खरात व विकास विलास खरात अशी मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तींची
नावे असून याबाबत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अण्णासो खरात यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
आहे.
प्रमोद गडदे, विकास गडदे, अशोक गडदे, विकास बंडगर, देवाप्पा
कोंडिगिरे, प्रवीण खरात, मिलिंद गडदे आदींच्या
विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दि 18 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली.
याचा अधिक तपास अमोल चव्हाण करत आहेत.
No comments:
Post a Comment