Sunday, December 23, 2018

जानेवारीमध्ये येणार एलेनाचा चित्रपट


सैफ अली खानचा एजंट विनोदबरोबरच अन्य चित्रपटांमध्ये दिसून आलेली अभिनेत्री एलेना कजानचा आगामी चित्रपट बटालियन 609 जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. बृजेश बटुकनाथ त्रिपाठी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या निर्माता नारायणदास लालवानी यांच्या या चित्रपटात छोट्या पडद्यावरील चर्चित अभिनेता व अभिनेत्री दीपिका कक्करचा पती शोएब इब्राहिम मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे, तर यामध्ये एलेनादेखील मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे

बिग कंटेंस मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात येणार असलेला चित्रपट बटालियन 609 भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धांच्या विषयाला स्पर्श करत असून, या चित्रपटात शोएब व एलेनाशिवाय फरनाज शेट्टी, विश्वास किनी, विकी आहुजा व विकास श्रीवास्तवनेदेखील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली आहे.

No comments:

Post a Comment