क्रेडिट कार्डामुळे आपलं आयुष्य बर्याच अंशी सुकर झालं आहे. कार्डाचा योग्य वापर केला तर
योग्य अर्थनियोजन करता येतं. मात्र खर्चाचा ताळमेळ बसवणं,
क्रेडिट मर्यादा घालून घेणं, वेळेत पैसे भरणं हे
सगळं साधता यायला हवं. क्रेडिट कार्डाचा वाढता वापर बघता त्यात
बरेच बदल होत आहेत. अधिकाधिक सुविधा दिल्या जात आहेत.
भविष्यातलं क्रेडिट कार्ड जास्त स्मार्ट होणार असल्याने त्याची झलक आता
पहायला मिळत आहे. ग्राहकांशी संवाद साधणारी, बटण दाबून पर्याय निवडण्याची सुविधा
उपलब्ध करून देणारी कार्डस बाजार येऊ लागली आहेत. या कार्डाच्या
वापरामुळे ग्राहकांना खर्चावर नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे.
खरेदी केल्यानंतर पैसे भरण्यासाठी कार्डवरचा एक पर्याय
तुम्ही निवडू शकता. हप्त्याने पैसे भरणं, पैसे भरल्यानंतर रिवॉर्ड पॉईंट्स मिळवणं आणि क्रेडिटवर पैसे भरणं हे तीन पर्याय
तुम्हाला मिळतात. हप्त्याचा पर्याय निवडल्यानंतर कालावधीची निवड
करण्याची मुभाही ग‘ाहकांना आहे. 6,12,18 आणि 24 महिन्यांच्या कालावधीपैकी एका पर्यायाची निवड
ग्राहक करू शकतात. निवड केल्यानंतर दिवा लागेल. गरज आणि सोयीनुसार ग‘ाहक पर्यायाची निवड करू शकतात.
बरेचदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलती आणि योजनांची खैरात करण्यात
येते. विविध कंपन्यांशी करार करून या सुविधा उपलब्ध करून देण्यात
येतात. विशिष्ट वेबसाईटवर चित्रपटाचं तिकिट काढलं तर एक तिकिट
मोफत, कार्डवर खरेदी केल्या जाणार्या पहिल्या
विमान तिकिटावर सवलत, मोठ्या दुकानांमधून केल्या जाणार्या खरेदीवर सवलत आदी योजनांमुळे ग्राहकांना अनेक लाभ मिळत आहेत. भविष्यात क्रेडिट कार्डचं रूप पालटणार असल्याचं हे द्योतक आहे.
No comments:
Post a Comment