Monday, December 24, 2018

साळमळगेवाडी शाळेचे केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

जत,(प्रतिनिधी)-
जिरग्याळ (ता. जत) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत नुकत्याच केंद्रास्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत साळमळगेवाडी शाळेने वैयक्तिक प्रकारात ६ प्रथम क्रमांकासह  पदक मिळविले.
अरमान शेखने लहान गट लांब उडी,मोठ्या गटात गोळाफेकमध्ये पूजा शेजूळ व म्हाळाप्पा हाबगोंडे तसेच १०० धावणे मी. वैष्णवी लवटे , २०० मी. धावणेमध्ये पूजा शेजूळ  यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.  रिले स्पर्धेत मुलीच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. मोठा गट मुली लांब उडीमध्ये अंकिता पवार व वंदना पडोळे संयुक्त द्वितीय क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकाची खालील क्रीडा प्रकारात बक्षिसे मिळवली. लहान गट मुले व मुली खो खो , मोठा गट मुले कबड्डी , धावणे १०० मी.मोठा गट मुले शुभम जाधव , मुली वंदना पडोळे , २०० मी. मोठा गट मुले शुभम जाधव , लांबउडी मोठा गट मुली अंकिता पवार व वंदना पडोळे. त्याचबरोबर म्हाळाप्पा हाबगैगोंडे दुसरा त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक लहान गट मुले १०० मी. धावणे अरमान शेख , रिले मुले व मुली ३ रा क्रमांक पटकावला.
या स्पर्धेकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाटील पडोळे व सर्व सदस्य सरपंच आण्णासो खांडेकर आणि उपसरपंच मासाळ व सर्व सदस्य, केंद्र प्रमुख रतन  जगताप , शाळेचे मुख्याध्यापक गुलाबसिंग पावरा,  महालिंग लंगोटे, सिताराम यादव, मनोहर जाधव, विठ्ठल कोळी,सुनिल सुर्यवंशी,रामेश्वर करळे आणि शुभांगी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment