Tuesday, April 30, 2019

लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये बालगाव येथील सूर्यनमस्कार योगसाधनेची नुकतीच नोंद

सांगली,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बालगाव येथे गतवर्षी दि. 21 जून 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ऐतिहासिक योग शिबिराची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये नोंद घेण्यात आली आहे. सूर्यनमस्कार योगसाधनेबाबत लिम्का बुककडून जिल्हा प्रशासनाला नुकतेच प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

Saturday, April 27, 2019

मानवता धर्म स्थापन करण्यासाठी सद्गुरु अवतार घेतात- आदिनाथ नेमाने

जत,(प्रतिनिधी)-
जगामध्ये धर्माच्या नावाखाली अनेक हिंसक घटना घडत आहेत,मानव धर्माच्या पाठीमागे लागुन आपले सुख गमावुन बसला आहे मानव वैर, निंदा, घृणा , ईर्शा, नफरत,या गोष्टीमध्ये अडकुन पडलेल्यामुळे त्याला जिवनामध्ये सुख,समाधान,शांती प्राप्त होत नाही या सर्व गोष्टींतुन बाहेर काढण्यासाठी प्रत्येक युगायुगाला जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणुन मानवता धर्म स्थापन करण्यासाठी सद्गुरु अवतार घेतात असे प्रतिपादन एस.आर.व्ही.एम्.हायस्कुल जत येथे आयोजित मानव एकता दिवसानिमित्त  सत्संग कार्यक्रमामध्ये आदिनाथ नेमाने (प्रचारक मुंबई) यांनी केले

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जत शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. रोहन मोदी

जत,(प्रतिनिधी)-
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या जत तालुका शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.रोहन मनोहर मोदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दोन दिवसांपुर्वी असोसिएशनची बैठक पार पडली. यात नव्या, उत्साही व संघटना बांधणी करणाऱ्या डॉक्टरची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.त्यानुसार डॉ.रोहन मोदी हे चांगले काम सांभाळू शकतात. त्यामुळे त्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच आणखी एक तरुण डॉक्टर शरद पवार यांनीही डॉ. रोहन मोदी यांच्यासमवेत काम करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.

Friday, April 26, 2019

दारू पाजली नाही,म्हणून एकास मारहाण

जत,(प्रतिनिधी)-
 फुकट दोन  काँटर दारू पाजली नाही म्हणून तोंडावर जोरदार बुक्की मारून पुढील एक दात पाडल्याच्या आरोपावरून लखन चंद्रकांत पाथरुट ( वय  ३०) व अजय महेंद्र कांबळे ( वय २५ ) रा.  दोघे वसंत नगर जत यांच्या विरोधात यल्लाप्पा परशुराम बामणे ( वय  ३५ रा. विठ्ठल नगर जत )   याने जत पोलीसात फिर्याद दाखल केली आहे . ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या  दरम्यान जत ते शेगांव रस्त्यावरील हॉटेल यशराज समोर घडली आहे . याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.

Wednesday, April 24, 2019

स्मार्टफोन’मुळे मामाचा गावसुद्धा हरवला

देशी खेळ झाले हद्दपार
जत,(प्रतिनिधी)-
टीव्ही,मोबाईल, कॉम्प्युटर, याशिवाय अन्य बैठे खेळांमुळे लगोरी, गोट्या, आंब्याच्या कोयीचा खेळ,लंगडी, सुरपारंब्या असे देशी खेळ गावागावतून हद्दपार झाले आहेत. यामुळे मामाचा गाव सुद्धा मुलांना आपलासा वाटेनासा झाला आहे.  त्यामुळे नात्यांवर देखील परिणाम होऊ लागला आहे.

राज्यातील दीड हजार गावे आणि चार हजार वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईची झळ

जत,(प्रतिनिधी)-
पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्यातील  धरणांमधील पाण्याच्या साठ्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भीमा खोर्‍यातील 25 पैकी 15 धरणांमधील पाणीसाठा 20 टक्क्यांपेक्षा कमी झाला असून, कृष्णा खोर्‍यातील धरणांमध्येही पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे. या खोर्‍यातील 13 पैकी सुमारे सात धरणांमध्ये 30 टक्क्यांहून कमी पाणीसाठा उरला असल्याचे दिसून येत आहे.

जतेत घरफोडी पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील विठ्ठलनगर येथील नितीन तुकाराम साळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी सुमारे पाच तोळे सोने व रोख साठ हजार रक्कम असा सुमारे पाच लाखांच्या मुद्देमाल लंपास केला. ही चोरी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास झाली.

जत तालुक्यात "थोडा है,थोडे कि जरूरत है "

जत,(मच्छिंद्र ऐनापुरे)-
जत तालुक्याला पाणी महत्त्वाचे आहे. पाणी असेल तर शेतकरी शेती करू शकतो. त्यामुळं चार मजुरांना काम मिळते. पाण्यामुळे लहान मोठे फळ प्रक्रिया सारखेउद्योग उभारले जाऊ शकतात. पाण्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. जत तालुक्यात बाहेरून पाणी सहजगत्या येऊ शकते. हे आता स्पष्ट झाले आहे. राजकारण्यांनी पाण्याची व्यवस्था केली तर बाकीचा विकास त्यांना करावा लागत नाही,तो आपोआप होतो. आता काही भागात पाणी पोहचले आहे. सत्ताधारी लोकांनी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी जत तालुक्यात सोडून तलाव भरल्यास शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहज निकाली निघू शकतो.

Thursday, April 18, 2019

आपले आदर्श आणि छंद आपली ओळख बनवितात : लेखक मच्छिंद्र ऐनापुरे


केंद्रशाळा खटाव येथे आठवीच्या विद्यार्थ्यांना निरोप 
 मिरज,(प्रतिनिधी)-
आपले आदर्श आणि छंद आपली ओळख बनवितात , असे प्रतिपादन लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी खटाव (ता. मिरज) येथे व्यक्त केले. ते जिल्हा परिषद केंद्रशाळा खटाव येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता बोलत होते. यावेळी प्रश्नोत्तर संवादातून मुलांना मोकळीक देण्यात आली होती.

वातावरण गरम आणि राजकारण नरम

जत तालुक्यातील स्थिती
जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता केवळ चार दिवस  शिल्लक राहिले आहेत. भाजप, स्वाभिमानी शेतकरी व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, काही नेते पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदार संघात फिरत असले तरी निवडणूक वातावरण नरमच आहे. उन्हाचा तडाखा वाढला असला तरी राजकारण मात्र थंड आहे. गावोगावी शांतता आहे.

पैशाच्या कारणावरून मारहाण

जत,(प्रतिनिधी)-
 तिप्पेहळ्ळी ( ता.जत ) येथे उसने पैसे परत देण्याच्या कारणावरून उज्वला शिवशरण ( वय ४० ) त्यांचे पती शिवाजी शिवशरण (४५ ) यांना लाथाबुक्क्या व काठीने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून अमित शिंदे,  महेश चव्हाण , संकेत भिसे,  अनिकेत भिसे  सर्व रा.तिप्पेहळ्ळी या चार जणांच्या  विरोधात उज्वला शिवशरण यांनी आज जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान तिप्पेहळ्ळी गावात घडली या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही .

Wednesday, April 17, 2019

सांगली जिल्ह्यातील काँग्रेस संपली:मुख्यमंत्री फडणवीस

जत,(प्रतिनिधी)-
  शंभर वर्षाच्या इतिहासात  काँग्रेसची सांगली जिल्ह्यात कुठेही शाखा नाही, अशी अवस्था झाली असून ज्यांना डाकू, लुटेरे म्हटले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात कसला आला स्वाभिमान? अशी खरमरीत टीका  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्यातील संख येथील प्रचार सभेत बोलताना केली.  जत तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारी म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Monday, April 15, 2019

बिळूर प्राथमिक उर्दू शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

जत (नजीरभाई चट्टरकी यांजकडून) -
जत तालुक्यातील बिळूर येथील   जि.प. प्राथ उर्दु शाळेत नुकतेच वाषिर्क स्नेसंमेलन व विविध गुणर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवा इस्लाम धर्मियांचे पवित्र कुराण पठनाने झाली.अल्पसंख्यांक योजनेचे जाणकार व जत येथील अंजुमन उर्दु हायस्कूल चे मुख्याध्यापक रईस अहेमद खान यांनी अल्पसंख्यांक प्रि मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेविषयी माहिती दिली तसेच जि.प.उर्दु शाळा उटगीचे मुख्याध्यापक नजीब पटेल यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व व त्याचे विद्यार्थी  जीवनातील सर्वांगीण  विकास  याविषयी मार्गदर्शन केले.

नामस्मरणाने देह पवित्र होतो - रामचंद्र डकरे

जत,(प्रतिनिधी)-
ब्रम्हज्ञान प्राप्त झालेनंतर जे गुण प्राप्त व्हायला पाहिजे ते गुण प्राप्त होताना दिसत नाही.जिवनामध्ये ब्रम्हज्ञानाची अखंड ज्योत कायम राहयाची असेल तर मुखामध्ये सदा ईश्वराचे नामस्मरण असले पाहिजे नामस्मरणानेच देह पवित्र होतो असे प्रतिपादन राम मंदिर जत येथे आयोजित निरंकारी साप्ताहिक सत्संगमध्ये आदरणीय रामचंद्र डकरे (प्रचारक सांगली) यांनी केले.

Saturday, April 13, 2019

वाढत्या उन्हाने जत तालुक्यात अघोषित संचारबंदी


जत,(प्रतिनिधी)-
 तालुक्यात सर्वत्रच सध्या उन्हाचा जोरदार तडाखा जाणवत असून, गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या उन्हाचा पारा 38 अंशाच्या वर गेल्याने वैशाख वणवा जाणवू लागला आहे. दुपारी उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमालीची रोडावली आहे. त्याच बरोबर आठवडे बाजारातही शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणार्या ग्राहकांची संख्याही रोडावली आहे.

जत पूर्वभागात प्रचाराची रणधुमाळी सुरू


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्याच्या पूर्वभागात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नेते एकीकडे व कार्यकर्ते दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली असून काही कार्यकर्ते नेत्यांच्या इशार्याकडे नजरा लावून बसले आहेत. जत तालुक्याच्या पूर्वभागात माडग्याळ, संख, दरीबडची, उमदी, जाडरबोबलाद, तिकोंडी, मुचंडी ही मोठी गावे असल्याने उमेदवारांच्या नजरा जत पूर्व भागाकडे लागल्या आहेत.

वाढत्या महागाईचा निवडणुकीतही फटका


जत,(प्रतिनिधी)-
 लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचाराला गती आली आहे. निवडणूक लढवणार्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. खर्चाची मर्यादा यंदाच्या निवडणुकीत कायम असली तरी प्रत्यक्षात किती खर्च केला जातो, हे सर्वांनाच माहिती आहे. उमेदवारांनीहोऊ दे खर्च, भाऊ हाय मोठा, खर्चाला नाय तोटा,’ अशी मानसिकता बनवली असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

सनमडी, येळवी तलावात म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्याच्या पूर्व भागातील 37 गावांसाठी 47 टँकरने 102 खेपांद्वारे अंकलगी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या तलावांमध्ये 220 एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा टँकर भरण्यासाठी एप्रिलअखेर पुरेल इतपत आहे. यासाठी येळवी व सनमडी या तलावात उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

‘रसद’ न आल्याने कार्यकर्ते ढेपाळले


 जत,(प्रतिनिधी)-
सांगली लोकसभा निवडणूक आता जातीच्या समीकरणावर आली आहे. भाजप असो की काँग्रेस आघाडी; नेते मनापासून प्रचार करतायेत का, हा खरा प्रश्न आहे. धनगर समाजातील काही गट गोपीचंद पडळकर यांच्या विजयासाठी मैदानात उतरला आहे. तर मराठा समाजाच्या मतांची विभागणी होऊन तिसर्या उमेदवाराला फायदा होऊ नये,यासाठी एक गट कार्यरत झाला आहे. असे असले तरी कार्यकर्ते मात्र प्रचारात उतरून ढेपाळले आहेत. रसद आली नसल्याने मतदारांपर्यंत कसं पोहचायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तरी वरवरच प्रचारयंत्रणा राबवली जात आहे.

जत तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी विशाल पाटलांना साथ : सुरेश शिंदे


जत,(प्रतिनिधी)-
 सगळे गट-तट विसरून एकत्र येत जत तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी विशाल पाटील यांना भरघोस मतांनी मताधिक्य देऊ, असा निर्धार तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे यांनी केला. लोकसभेचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या उमराणी येथील सभेत ते बोलत होते. यावेळी विशाल पाटील, विक्रम सावंत, गंगाधर बजंत्री, पिरगोंडा हुल्याळकर, अशोक पाटील यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, April 10, 2019

सांगलीची पुन्हा राज्यभर चर्चा, हाताच्या चिन्हाशिवाय प्रथमच होतेय निवडणूक


जत,(प्रतिनिधी)-
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने आणि काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून राज्याच्या राजकारणात ओळख निर्माण करणारी सांगली या निवडणुकीत राज्यभर खूपच चर्चेत राहिली. सांगलीची जागाच काँग्रेसकडून काढून घेऊन खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला दिल्याने काँग्रेसच्याबाबतीत एक इतिहास रचला गेला आहे.  खासदार राजू शेट्टी यांचे दादा घराण्यावरील प्रेमाने अखेर त्यांना सांगलीची जागाही मिळाली आणि उमेदवाराच्या रुपाने दादांचा नातूही मिळाला. सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक आजच्या घडीला रंगतदार बनली आहे.

दुष्काळी जनतेला खुळ्यात काढणार्‍यांना मते देऊ नका : विक्रम सावंत


जत ,(प्रतिनिधी)-
 पाणी देण्यावरून दुष्काळी जनतेला खुळ्यात काढणार्यांना दारातही उभे राहू देऊ नका, असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी केले. सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जत तालुक्यातील डोर्ली येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

राजकारणासाठी पाणी अडविणार्‍यांना जनता माफ करणार नाही : विशाल पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 भाजपमध्ये आला तरच पाणी देतो, असे म्हणून राजकारणासाठी पाणी अडविण्याचं पाप ज्यांनी केलं, त्यांना जनता कदाफी माफ करणार नाही. त्यामुळे स्वाभिम ानीचाच विजय होणार आहे, असा विश्वास स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी डफळापूर (ता. जत) येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

पारावरच्या गप्पांना चढू लागला रंग


जत,(प्रतिनिधी)-
मोबाईलच्या आणि हायटेक प्रचाराच्या जमान्यात अजूनही खेडोपाडी पारावरच्या गप्पा महत्त्वाच्याच मानल्या जातात. आज गावागावातले पारावरचे कट्टे पुन्हा गर्दीने फुलू लागले आहेत. साहजिकच सांगली लोकसभेचे धूमशान दिवसेंदिवस अधिकच जोर धरू लागल्याने पारावरच्या गप्पांना ऊत आला आहे. राजकारणाचे आडाखे बांधण्याच्या चर्चेने रंगू लागल्या आहेत. सांगली लोकसभेच्या तिरंगी लढतीवर सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

Tuesday, April 9, 2019

सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात: प्रांताधिकारी


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळाशी सामना करण्यास प्रशासन सज्ज आहे. तालुक्यात चारा छावणी चालू करण्यास प्रशासन सज्ज असून सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन छावणी चालू करण्यास पुढे येण्याचे आवाहन प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.
गोंधळेवाडी येथील चिक्कलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी चालू केलेल्या चारा छावणीला प्रांताधिकारी ठोंबरे यांनी भेट दिली.

खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची बावीस लाखांची फसवणूक

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : लिपीक, अव्वल कारकुनचा गैरव्यवहारात पुढाकार 
जत,(प्रतिनिधी)-
जत तहसीलचा लिपीक लक्ष्मण भवर व प्रांत कार्यालयातील अव्वल कारकुन बिपीन मुगळीकर यांनी अवैध वाहतूक करणार्‍या कडून मोठ्या रकमा घेऊन बोगस चलने केली. प्रत्यक्षात शासकीय खजिन्यात दंडाची रक्कम जमा केलेली नाही. २२ लाख ५० हजारांचा हा अपहार असून बनावट शिक्के, खोटी कागदपत्रे तयार करून आमची व शासनाची फसवणूक केल्याचा दावा ट्रक व डंपर मालकांचा आहे. 

जत तालुक्याला मोफत पाणी देणारः विशाल पाटील

फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात स्वागत 
जत,(प्रतिनिधी)-
प्यायला पाणी नसताना शेतीच्या पाण्यासाठी पैसे घेण्याचे पाप भाजप ने केले आहे पण मी तुम्हाला वचन देतो खासदार झाल्यावर शेती ला पाणी मोफत दिले जाईल. असे अश्वासन स्वाभिमानी चे उमेदवार विशालदादा पाटील यांनी दरिबडची येथे दिले.

मध्यमवर्गीय व मोठया व्यवसायिकांसाठी पतसंस्था उपयोगी:डॉ.रविंद्र आरळी


जत (प्रतिनिधी):
मध्यमवर्गीय व मोठया व्यवसायिकांना अर्थपुरवठा करण्यासाठी पतसंस्थाच उपयोगी पडते, सहकारी संस्थेचे दररोज एक नियम बदलत असून यात बँका व पतसंस्था भरडल्या जात आहेत. त्यामुळे सहकारी संस्था काढून ती टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जत येथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर रवींद्र आरळी यांनी जत येथे केले.

केवळ घरपोच सेवेमुळे जारच्या शुध्दतेचे निकष रामभरोसे


उन्हाळ्यात जारचे पाणी महागले
जत,(प्रतिनिधी)-
चैत्र महिन्याला प्रारंभ होण्यापूर्वीच उन्हाचा कडाका वाढत असतानाच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असल्याने अनेकांचे बोअर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे पाण्याची मागणीही वाढल्याने जारचे पाणी विके्रेत्यांची चांदी सुरू झाली आहे. जारचे पाणीही आता तब्बल दहा रुपयांनी महागले आहे. जारच्या पाण्याची कोणतीही शुध्दता न तपासताच केवळ घरपोच सुविधा असल्याने नाईलाजास्तव नागरिकांना जारचे पाणी घ्यावेच लागत आहे.

Monday, April 8, 2019

चारा-पाण्याअभावी मेंढ्यांची होतेय उपासमार


जत तालुक्यातील परिस्थिती:मेंढपाळ दुष्काळाने पिचला
जत,(प्रतिनिधी)-
जतसह दुष्काळी आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. अनेकांचे पोट याच व्यवसायावर आहे. उपजीविकेचे साधन म्हणून पाहात असलेल्या या मेंढपाळांच्या आयुष्यात मात्र सतत भटकणं हेच लिहून ठेवलं आहे. अलिकडच्या काही वर्षात पाऊसमान कमी होत चालल्याने वाडवडिलार्जित मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येत आहे.यंदा तर फारच बिकट अवस्था झाली असून चारा-पाणी नसल्याने मेंढ्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे.

Sunday, April 7, 2019

कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा 12 मे पासून


कोल्हापूर,(प्रतिनिधी)-
 कोल्हापूर - तिरूपती आणि कोल्हापूर - हैदराबाद मार्गावर 12 मे पासून इंडिगो एअर लाईन्स कंपनीकडून विमानसेवा सुरू होत आहे.या विमानसेवेची बुकिंग व्यवस्था गुरूवारपासून सुरू झाली. ऑनलाईन बुकिंगसह कोल्हापूर विमानतळावरही बुकिंग सेंटर सुरू केले आहे. उडान योजनेंतर्गत कोल्हापूरातुन तिरूपती आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्यास इंडिगो एअर लाईन्स कंपनीस परवानगी मिळाली आहे.

कु. समृद्धी कर्‍हाळे हिचे यश


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील अचकनहळ्ळी गावाखाली असलेल्या कोळीवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी कु. समृद्धी सुदाम कर्हाळे या पहिली इयत्तेत असलेल्या विद्यार्थीनीने अक्षरगंगा प्रज्ञाशोध राज्यस्तरीय  परीक्षेत 150 पैकी 144 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख जयवंत वळवी, वर्गशिक्षिका सगुना लिंबाळकर, अनुराधा मलाड, विस्तार अधिकारी आर.डी. शिंदे, तानाजी गवारी यांचे मार्गदर्शन लाभले.

जत शाळा नं. 1 मध्ये पाडव्याच्या मुहुर्तावर 30 विद्यार्थी दाखल


जत,(प्रतिनिधी)-
गुडी पाडव्याच्या मुहुर्तावर जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा क्र.1 मध्ये पहिली इयत्तेत मुलांचे नाव दाखल करण्यासाठी पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या दिवशी तब्बल 30 मुलांनी पहिलीत प्रवेश घेतला.या मुलांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी बी.एन. जगधने, शिक्षणविस्तार अधिकारी आर.डी. शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.

संजय पाटील यांना निवडणूक सोपी राहिली नाही


जत,(प्रतिनिधी)-
सुरुवातील विद्यमान खासदार संजय पाटील यांना सोपी वाटणारी लोकसभा निवडणूक रंगतदार आणि आव्हानात्मक बनत गेली आहे. त्यामुळे संजय पाटील यांची प्रचारादरम्यान मोठी दमछाक होणार आहे. भाजपातून बाहेर पडलेल्या गोपीचंद पडळकर यांनी यात उडी घेऊन आणखी रंगत आणली आहे. त्यामुळे आता कुणालाच विजयाचा दावा करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. प्रचार यंत्रणा आणि विद्यमान खासदारकी यामुळे श्री. पाटील यांनी इतरांच्या तुलनेत अगोदरच लोकांपर्यत पोहचण्यात यश मिळवले आहे.

जत तालुक्यात शिक्षक संघाला खिंडार


थोरात गटातील कार्यकर्त्यांचा शिक्षक समितीत प्रवेश
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुका प्राथमिक शिक्षक संघात (थोरात गट) फूट पडली असून जत तालुक्याचे सरचिटणीस सुरेश पाटील व शंकर पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिक्षक समितीमध्ये नुकताच प्रवेश केला. यामुळे थोरात गटाला मोठा हादरा बसला आहे. विशेषत: कन्नड माध्यमाच्या शिक्षकांमध्ये समितीचे आणखी वर्चस्व वाढण्यास मदत झाली आहे.

जतमध्ये डॉ चिकोडी यांचे स्पंदन हॉस्पिटलचे उदघाटन

जत,(प्रतिनिधी)-
डॉ प्रशांत चिकोडी यांचे  गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्याने सुरू होत असलेल्या स्पंदन हॉस्पिटलचे  मान्यवर डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विट्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर मोहन लकडे यांच्याहस्ते  उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जतचे डॉ मनोहर मोदी होते.प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ सचिन लकडे उपस्थित होते.

Friday, April 5, 2019

अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता शिबीर

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने रविवार दि.7 रोजी एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होणार आहे.यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते व जिज्ञासू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Thursday, April 4, 2019

जत पंचायत समितीच्या कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या


जत,(प्रतिनिधी)-
 जत पंचायत समितीमध्ये समाजकल्याण विभागात लेखनिक म्हणून काम करणारे दीपक सोनाजी बर्गे (वय 38) याने गुरुवारी सकाळी जत ते सांगली रस्त्यावर असलेल्या पंचायत समि ती कर्मचारी निवासस्थानामध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

वायफळ येथे विहिरीवर थांबलेल्या मजुराचा चक्कर आल्याने विहिरीत पडून मृत्यू


जत,(प्रतिनिधी)-
 वायफळ (ता. जत) येथून जवळच असलेल्या मकबूल मोहला शेख यांच्या विहिरीचे काम सुरू होते. प्रशांत आबासाहेब यादव (वय 36. रा. वायफळ ता. जत) हे काम करण्यासाठी दररोज जात होते. दुपारी ते विहिरीवर थांबले असता अचानक त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, वायफळ येथे गेल्या अनेक दिवसांपासून मकबूल मोहला शेख यांनी विहिरीचे काम सुरू केले होते. कामासाठी काही मजूर दररोज काम करत होते. यात प्रशांत यादव हे कामासाठी येत होते. काम सुरू असताना ते विहिरीवर ते थांबले असताना अचानक त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत झाला.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आगाऊ वेतनवाढीसाठी न्यायालयात जाणार


औरंगाबाद खंडपीठाचा आगाऊ वेतन देण्याबाबत निकाल
जत,(प्रतिनिध)-
 आगाऊ वेतनवाढीबाबत औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने संबंधित शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या धर्तीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना अतिउत्कृष्ट कामासाठी दिल्या जाणार्या आगाऊ वेतनवाढीसाठी न्यायालयात जाणार असल्याचे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी सांगितले.

गुढा पाडव्याला मुहुर्ताच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग


जत,(प्रतिनिधी)-
हिंदू नववर्ष असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दाखल झालेल्या साखरेच्या गाठीने जत बाजारपेठेलाही गोडवा आला आहे. सणाच्या पूर्वसंध्येला साखरेच्या माळा चिव्यांची काठी अशा पूजेच्या साहित्याबरोबरच मुहुर्ताच्या खरेदीची ही सर्वत्र लगबग सुरू झाली आहे.

Wednesday, April 3, 2019

प्रा. चंद्रसेन मानेपाटील यांचे सामाजिक परिवर्तनामध्ये योगदान महत्वाचे

:प्राचार्यबडॉ.सुहास साळुंखे
जत, (प्रतिनिधी)-
प्रा. चंद्रसेन मानेपाटील यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्यांत  प्रेरणा निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांनी अनेक सामाजिक चळवळीमध्ये काम करून जत तालुक्याच्या  सामाजिक चळवळी मध्ये फार मोठे योगदान दिले म्हणून त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवा गौरव समारंभ संपन्न होत आहे असे भावपूर्ण उदगार सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुहास साळुंखे यांनी केले.

इंटरनेटमुळे ढासळले घरातील मूल्यशिक्षण


जत,(प्रतिनिधी)-
परीक्षा झाल्याशिवाय मोबाईलला हात लावायचा नाही.टीव्ही पाहायचा नाही,लेपटॉप उघडायचा नाही ,अशी तंबी दिली गेल्याने परीक्षा काळात त्याकडे ढुंकूनही न पाहिलेली मुले परीक्षा झाल्यावर मात्र कुणाचे ऐकत नाहीत.परंतु मुले या कालावधीत काय पाहातात,काय नाही याकडे लक्ष देण्याचे आवश्यकता आहे.आई-बाप  आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे मुले काय करतात याकडे लक्ष देत नसल्याने घरातील नीतीमत्ता ढासळत  चालली असल्याचे चित्र दिसत आहे.

झाडे कमी झाल्याने नैसर्गिक शिंदी उत्पादनात घट


जत,(प्रतिनिधी)-
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे  तसेच पाण्याच्या  पातळीत झालेली कमालीची घट याचा फटका कमी पाण्यावर जगणार्या शिंदीच्या झाडांवरही झाला असून त्यामुळे नैसर्गिक शिंदी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहेत. रासायनिक पावडर आणि पाणी  याची कृत्रीम शिंदी बनवून लोकांची फसवणूक केली जात आहे.

घामाच्या धारांनी नागरिक हैराण


 जत,(प्रतिनिधी)-
 भाजून काढणार्‍या उन्हामुळे बाहेर पडणेही मुश्किल होत असून, घामाच्या धारांनी जतकर हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून 42 अंश सेल्सिअस तापमान गेल्याचे दिसत आहे.

Tuesday, April 2, 2019

नेते प्रचारात, प्रशासन निवडणूक तयारीत आणि दुष्काळग्रस्त काळजीत


पाणी,चारा, रोजगाराचा प्रश्न गंभीर; सवलती कधी मिळणार?
जत,(प्रतिनिधी)-
सध्या लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. उमेदवारी दाखल करून काहींनी प्रचाराचा नारळदेखील फोडला आहे. राजकारणी लोक यात अडकून पडले आहेत. प्रशासन मतदान अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण,बूथ पाहणी, अन्य तयारी यात गुंतले आहेत.मात्र दुसर्या बाजूला दुष्काळग्रस्त लोक पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करताहेत. हाताला काम नाही, जनावरांना चारा नाही अशा कठीण परिस्थितीत दिवस काढत आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या टँकरवाल्यांचे फावले असून त्यांचे नखरेही लोकांना झेलावे लागत आहेत.

स्थानिक प्रश्‍नांनाच दिले जाणार महत्त्व


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून गेली दोन दिवस जत तालुक्यात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी प्रचार यंत्रणा सुरू केली आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांचेही कार्यकर्ते कामाला लागले आहेत. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचेही आता प्रचार दौरे सुरू होतील. त्यामुळे आता खर्या अर्थाने प्रचाराला रंगत येणार आहे. मात्र जत तालुक्यात स्थानिक प्रश्नांनाच महत्त्व दिले जाण्याची शक्यता आहे. पाणी, वीज, रस्ते, औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती असे किती तरी प्रश्न तालुक्यापुढे आ वासून उभे आहेत. साधारण: नेहमीप्रमाणे याच प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवले जाईल.पण यांची पूर्तता कधी होणार हाच प्रश्न आहे.

जत तालुक्यात ऑनलाईन सातबारा उतार्‍याचा फज्जा


जत,(प्रतिनिधी)-
 महसूल खात्याचे ऑनलाईन नोंदी करण्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे ऐन मार्च महिन्यात शेतकर्यांना मोट्या प्रमाणात अडचणी तोंड द्यावे लागले. सातबारा उतार्यावरील नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याने व त्याचे उतारे शेतकर्यांना वेळेत न मिळाल्यामुळे तालुक्यातील 50 टक्के शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याचा प्रकार घडला आहे. तलाठी कार्यालयात शेतजमिनीची खरेदी, पिकाचे वारसाच बक्षीस खरेदीपत्र, हक्क सोडपत्र, विहीर, बोअर नोंदी, पिकांच्या नोंदी, बँक बोजा, - करार, बोजा चढविणे-उतरविणे आदी अनेक कामे प्रलंबित पडली आहेत.

मुचंडीत नुकसानग्रस्त द्राक्षबागेचा पंचनामा


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील मुचंडी (ता. जत) येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता अचानक वादळी वारे, पाऊस व गारपिटीला सुरुवात झाली. या गारपिटीने दोन एकर बागेतील संपूर्ण द्राक्षबागेचे नुकसान झाले असून या शेतकर्याचे 20 लाखांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास खाली पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Monday, April 1, 2019

सेवानिवृत्तीनिमित्त नागाप्पा होर्तीकर यांचा सत्कार


जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसंगी (जत )येथील मुख्याध्यापक नागाप्पा सोमाणा होर्तीकर यांची सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामपंचायत आणि शाळा व गुड्डापूर केंद्राच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा दुहेरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा : शिवाजी खांडेकर


जत,(प्रतिनिधी)-
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या युवकांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करून आपल्या आयुष्यातील करिअरला सुरवात करावी, असे प्रतिपादन शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे महासचिव शिवाजी खांडेकर यांनी केले. ‘येळवी यूथ फेस्टिव्हल -2019’चे आयोजन सावली फौंडेशन यांच्या वतीने आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

संजय पाटील यांची जत तालुक्यात जोरदार प्रचार मोहिम


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी जत तालुक्यात आपल्या प्रचाराची जोरदार मोहिम राबवली. तालुक्यातल्या दक्षिण आणि उत्तर भागातील अनेक गावांना भेटी दिल्या आणि तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा संधी द्या, असे आवाहन लोकांना केले.

अनिल अंकलगी म्हाडा संघटनेच्या अध्यक्षपदी


जत,(प्रतिनिधी)-
 येळवीचे सुपुत्र ओंकारस्वरूपा सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक अनिल अंकलगी यांची पदवीधर अभियंता म्हाडा संघटनेच्या अध्यक्षपदी 159 विरूध्द 47 (112) मतांनी निवड झाली. अनिल अंकलगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान मिळावे म्हणून त्यांच्यासाठी विविध भागात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व क्लासेस सुरु केले. जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय यंत्रणा गतिमान करून यशाची शिखरे गाठत म्हाडा पदवीधर अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.

जत तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा संधी द्या : संजय पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुका हा कायम स्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यातील कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या, असे प्रतिपादन सांगली लोकसभा भाजप शिवसेना व युतीचे उमेदवार संजय पाटील यांनी केले. जत तालुक्यातील बिळूर, उमराणी, बसर्गी, गुगवाड, वज्रवाङ, गुगवाड, डफळापूर आदी भागात त्यांनी भेटी देऊन मतदारांची थेट संवाद साधला.

वंचित आघाडीच्या उमेदवारीचा घोळ मिटेना


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली लोकसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी मिळवण्याचा गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न सफल होणार नसल्याची चर्चा आहे. पडळकरांना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी नागपुरात बोलावून घेतले. परंतु त्या अगोदरच पडळकर हे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असलेले व धारकरी म्हणून गडमोहिमेत अनेकदा सहभागी झालेले पुरावे अॅड. आंबेडकरांपर्यंत पोहोचले. त्यामुळे आंबेडकरांनी सांगलीच्या उमेदवारीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिल्याची चर्चा आहे.