सांगली,(प्रतिनिधी)-
जिल्हा
परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हा परिषदेने
‘माझी शाळा’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला
आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देमशुख व सी. ई. ओ. अभिजित राऊत यांनी ही माहिती
दिली. अंतरंग-बाह्यरंग बदलण्यासाठी निकष
ठरवून देण्यात आले असून माजी विद्यार्थ्यांपासून खासदारांपर्यंत सर्वांकडून आवश्यक
मदत घेतली जाईल. अशा शाळांना पंचतारांकित शाळा म्हणून गौरवले
जाणार आहे.
दिव्यांग
अभियान नंतर हे दुसरे महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून यामुळे जिल्हा परिषद शाळा
कात टाकतील, अशी अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेच्या
1690 शाळा आहेत. तेथे आर्थिक दुर्बल, वंचित, सामान्य, शेतकरी,
कष्टकरी वर्गातील मुले शिकतात. ग्रामीण भागातील
या मुलांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी
लोकसहभागासह विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गती देण्याचा विचार सुरू होता.
त्याला आता मूर्त स्वरुप आल्याचे श्री. देशमुख
यांनी सांगितले.
ते म्हणाले, केंद्रप्रमुख आणि
उपक्रमशील शिक्षण यांची यात महत्त्वाची भूमिका असेल. ते शाळेचे
प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी सुरु करतील. ग्रामसभेसमोर
सादरीकरण करून प्रत्यक्ष काम सुरू होईल. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती
सदस्यांच्या निधीतून मागणी करता येईल. माजी विद्यार्थ्यांना मदतीचे
आवाहन करता येईल. कंपन्यांकडून निधी मिळवता येईल. ही सर्व मदत वस्तू स्वरुपात घ्यावी लागेल. रोख रक्कम
स्वरुपात मदत घेऊ नये. हे करताना शाळेची पूर्वीची स्थिती आणि
आताची स्थिती याची यशोगाथा तयार करावी. हे सारे निकष पाळून दर्जा
उंचावणार्या शाळांना पंचतारांकित शाळेचा दर्जा दिला जाईल.
अनेकदा वैयक्तिक आर्थिक फायदा पाहून शासकीय निधीतून योजना आखल्या जातात.
गावाच्या हितापेक्षा पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदारांचे
हितच अधिक पाहिले जाते. ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोग
निधीतून शाळांत सौर ऊर्जा पॅनेल बसवण्याचा घाट घातला होता. त्यांना
हा झटका आहे. शाळांत निधी खर्च करण्याच्या प्राधान्यक्रम यादीत
सौरऊर्जा पॅनेल, पेव्हिंग ब्लॉकचा समावेशच करण्यात आलेला नाही.
त्यामुळे निधी योग्य ठिकाणी खर्च होईल, अशी अपेक्षा
आहे.
लोकसहभागातून सुविधा
शाळांच्या सुविधांसाठी प्राधान्याने प्रयत्न भौतिक
सुविधा: दुरुस्ती कामे, पिण्याच्या पाण्याची सुविधा,
हात धुण्याची सुविधा, विद्युत सुविधा, बस्कर पट्टी, फर्निचर, धान्य टाकी,
ऊर्जा व्यवस्था, क्रीडा साहित्य. अध्यय- अध्यापन: डिजिटल क्लासरुम, इन्टरॅक्टिंग
बोर्ड, फळा, शिक्षण साहित्य, पुस्तके, शैक्षणिक सॉफ्टवेअर. इतर:
बगीचा, परिसर सुशोभिकरण,
अतिरिक्त पोषण आहार, रंगमंच.
No comments:
Post a Comment