Friday, December 28, 2018

यल्लमादेवी यात्रेत खिलार जनावरे, शेतीमालाचे प्रदर्शन


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व श्रीमंत विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवार जत यांच्या संयुक्त विद्यमाने यल्लम्मादेवी यात्रेनिमित्त खिलार जनावरे व शेतीमाल प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, दि. 31 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे धनंजय डोईफोडे यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दयगोंडा बिरादार यांनी दिली.

 श्री. बिरादार म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांगली मार्केट कमिटी व श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार यांच्या संयुक्त विद्यमाने यल्लम्मादेवी यात्रेनिमित्त खिलार जनावरे व शेतीमालाचे भव्य प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले आहे. समारंभासाठी सांगली येथील विशेष लेखापरीक्षक डी. पी. देसाई, किरण पाटील, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सचिन पाटील, अप्पर तहसीलदार अर्चना पाटील, बी ङी ओ. अर्चना वाघमळे, मुख्याधिकारी अभिजित हराळे, उपअभियंता संजय काळबांधे आदी उपस्थित राहणार आहेत.
 शेतीमाल व उत्कृष्ट जनावरांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आमदार मोहनराव कदम, शार्दुलराजे डफळे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, माजी आमदार उमाजी सनमडीकर, विक्रम सावंत, दिनकर पाटील, पी. एम .पाटील, बसवराज पाटील, महादेव पाटील, बाबासाहेब कोडग, ॅड. युवराज निकम, नाना शिंदे, आप्पाराया बिरादार, आकाराम मासाळ आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती बिरादार यांनी दिली.

No comments:

Post a Comment