Saturday, December 22, 2018

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली,(प्रतिनिधी)-
राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रिडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्यांक व वक्फ बोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे हे रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 5.50 वा. मिरज येथे आगमन व शसकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. सकाळी 9 वा. श्री अंबाबाई तालिम संस्था, मिरज आयोजित क्रिडा, आयुर्वेद व योगतज्ञ वैद्य म. द. करमरकर स्मृती पुरस्कार 2018 या कार्यक्रमासाठी उपस्थिती.
स्थळ - संस्थेचे एस.बी. जी. आय. कॉलेज, टिळकनगर, मिरज. सकाळी 11 वा. विलिंग्डन महाविद्यालय सांगलीच्या पदव्युत्तर प्रयोगशाळा नूतन इमारतीचा भूमीपुजन समारंभास उपस्थिती. स्थळ - विलिंग्डन महाविद्यालय, सांगली. दुपारी 12.30 वा. टिळक स्मारक मंदिर येथे सदिच्छा भेट. दुपारी 12.45 वा. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी या संस्थेस भेट. सायकांळी 5 वा. राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ - इस्लामपूर. सायंकाळी 6 वा. भाजप नुतन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ - राजारामबापू नाट्यगृह, इस्लामपूर व रात्रौ 10.30 वा. ताकारी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment