Tuesday, December 25, 2018

जत येथील राजे रामराव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

जत,(प्रतिनिधी)-
     जत येथील राजे रामराव महाविद्यालयात २७, २८ व २९ डिसेंबर २०१८ रोजी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जास्तीत जास्त संशोधकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे,प्रा. डॉ. संजय लठ्ठे व प्रा. डॉ. आप्पासाहेब भोसले यांनी केले आहे.

     'अडव्हान्ससेस  इन मटेरियल सायन्स' या विषयावर पदार्थविज्ञान विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेस बांग्लादेश येथील कतार युनिव्हर्सिटी कतार येथील प्रा. डॉ. अबूबक्र अब्दुल्ला यांच्यासह त्यांचे पाच सहकारी संशोधक तसेच आफ्रिकेतील म्युनिआ कोनाक्रे येथील हायर इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ऑफ ममाऊ  येथील प्रा. हब्बा पॉल व झाम्बिया येथील “युनिव्हर्सिटी ऑफ झाम्बिया” प्रा. इब्रिमा डारबो, नेपाळ मधील त्रिभुवन युनिव्हर्सिटी, कीर्तीपूर येथील प्रा. प्रवीण शर्मा सहभागी होणार आहेत.
     विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यामध्ये संशोधनाचे आदान-प्रदान व्हावे हा परिषदेमागील हेतू असून या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये राजे रामराव महाविद्यालय व केमिकल इंजनिअरिंग होवान विद्यापीठ (चीन ) यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस करार होणार आहे. यापूर्वी २०१६ मध्ये जपान येथील टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स यांच्या बरोबर सामंजस्य करार करण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय परिषदेस तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉग्यूक विद्यापीठ, साऊथ कोरिया, युनिव्हर्सिटी ऑफ टॉरिओ इटली, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, पुणे विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, मुंबई येथील प्राध्यापक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी पदार्थविज्ञान विषयाच्या संशोधकांनी या परिषदेत आपले संशोधनपर निबध पाठवावेत व आंतरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ  ढेकळे यांनी केले.

No comments:

Post a Comment