जत,(प्रतिनिधी)-
जाडर बोबलाद (ता. जत) गावात शेतकऱ्याने कर्जास
कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. श्रीशेल सोमनिंग मड्डूर (वय 50) असे
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून गुरुवारी मध्यरात्री राहत्या घराच्या
पाठीमागील बाजूस असणाऱ्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे
निदर्शनास आले. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात मुलगा काशिनाथ मड्डूर याने फिर्याद दाखल
केली आहे.
अधिक माहिती अशी, श्रीशेल
यांनी वर्षभरापूर्वी जाडरबोबलाद सर्व सेवा सोसायटीचे कर्ज तीस हजार व गावातून हात
उसने म्हणून दोन लाख रुपये घेऊन शेतामध्ये बोर मारले होते. पाणी लागल्यानंतर
त्यांनी चार एकरापैकी दोन एकरमध्ये डाळिंब बाग उभा केली. मात्र, गेल्या नोव्हेंबर महिन्यात बोरचे पाणी बंद झाले. प्रति टँकर अठराशे
रुपयाने पाणी विकत घेऊन बाग जगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आर्थिक
परिस्थिती हलाखीची असल्याने श्रीशेल यांनी काही दिवस हा प्रयत्न चालवला. मात्र,
त्यांना काहीसे यश मिळाले नाही. पीक वाया गेले. सोसायटीच्या कर्जाचा
हप्ता, बाहेरून घेतलेल्या पैशाची परत पेड कशी करायची या
विवंचनेत गुरुवारी मध्यरात्री त्यांनी घराच्या पाठीमागे असणाऱ्या लिंबाच्या झाडाला
दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मड्डूर वस्तीजवळील जिल्हा परिषद कन्नड शाळा आहे.
नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता जेवण करून ते शाळेत झोपायला गेले होते. शुक्रवारी
सकाळी पाच वाजता आई लक्ष्मीबाई व भाऊ सिद्धाप्पा मड्डूर यांनी ही घटना पाहिली.
त्यांना तीन मुली, एक मुलगा असून तीन मुलींचा विवाह झाला
आहे. याचा अधिक तपास पोलीस गोदे हे करत आहेत.

No comments:
Post a Comment