सांगली,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र
दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पाणी फौंडेशन’च्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2019’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील कार्यालयात
करण्यात आली. राज्यातील जलसंवर्धन, कृषी
आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी आणि
जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. हे व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या बैठकीत सामील झाले.
मुख्यमंत्री
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण
परदेशी, पाणी फौंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान, किरण राव, पाणी फौंडेशनचे सी.ई.ओ. सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे यामध्ये सहभागी झाले होते.
8 एप्रिल ते 22 मे दरम्यान ही स्पर्धा आहे.
No comments:
Post a Comment