Thursday, December 20, 2018

रामपूरप्रकरणी कारवाई करा; अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन


कारवाईत टाळाटाळ होत असल्याचा आरोप
जत,(प्रतिनिधी)-
 रामपूर ग्रुप मल्लाळ गावच्या शासकीय निधीत झालेल्या अनियमिततेबाबत तत्कालीन ग्रामसेविका एस. एन. म्हस्के, सरपंच संगीता कोळेकर व ठेकेदार; तसेच इतर अधिकारी यांच्यावर निलंबनाची व फौजदारी कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या आरोप करीत रामपूर ग्राम स्थांच्यावतीने पुणे आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्राम पंचायत सदस्य नितीन शिवशरण, बिराप्पा माने, रमेश कोळेकर यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन पुणे विभागाचे आयुक्त व उपायुक्त (विकास) यांना दिले आहे. 22 डिसेंबरपर्यंत संबंधितांवर निलंबन, खातेनिहाय चौकशी व फौजदारीची कारवाई करावी; अन्यथा 27 पासून पुणे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, रामपूर गावच्या तत्कालीन ग्रामसेविका, सरपंच व इतर जबाबदार अधिकारी व ठेकेदार यांनी संगमताने ग्रामपंचायत रामपूरमधील अनुसूचित जाती व नव बौद्ध वस्तीचा विकास करणे, ग्रामपंचायत निधी, पाणीपट्टी, रोजगार हमी योजनेच्या निधीत, 13 वा वित्त आयोग निधी, 14 वा वित्त आयोग निधी, तंटामुक्त अभियान निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय निर्मल ग्राम पुरस्कार, सर्व्हे नंबर मधील खुल्या जागेच्या नोंदीत मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार केलेचेही म्हटले आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्व संबंधित अधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. पंचायत राज कमिटीच्या दौर्यावेळी त्या कमिटीनेही निलंबनाची कारवाई करण्याचे दिलेल्या आदेशाचे प्रोसिडिंग झाले आहे. तरीही या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात टाळाटाळ होत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी चौकशी करून अहवाल जि.. सी... यांना पाठवूनही अनेक दिवस झाले आहेत. तरीही याप्रकरणी काहीच कारवाई होत नसल्याने कारवाईस टाळाटाळ होत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप श्री. शिवशरण यांनी केला आहे.
ग्रामसेविका एस.एन.मस्के निलंबित
रामपूर मधील अनियमितते प्रकरणी तत्कालीन ग्रामसेविका एस.एन. मस्के यांना निलंबित करण्यात आले आहे. जत बीडिओ यांनी दिलेल्या अहवालात मस्के यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मस्के यांची या प्रकरणी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. दरम्यान या प्रकरणातील इतर व्यक्तींवरीव कारवाईबाबतचे अधिकार हे वरिष्ठ कार्यालयाकडे आहेत. त्यामुळे इतरांवर वरिष्ठ कार्यालयाकडून काय कारवाई होते याकडे लक्ष आह

No comments:

Post a Comment