Sunday, December 23, 2018

कतरिनाविषयी नेहमी आदर वाटला आहे : दीपिका


बॉलिवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोणचे म्हणणे आहे की, तिच्या मनात कतरिनाविषयी नेहमी आदरच राहिला आहे. दीपिका पदुकोण व कतरिना कैफ या दोघींनीही रणबीर कपूरला डेट केले आहे. दोघींच्याही नात्यामध्ये चढ-उतार आल्याच्या बातम्या नेहमीच कानावर पडत राहिल्या. त्यानंतर दीपिकाने रणवीर सिंगबरोबर विवाह केला. कतरिनाही आपल्या व्यक्तिगत आयुष्यात पुढे गेली व सध्या तिचा संपूर्ण फोकस आपल्या करिअरवर आहे

दोघींमधील खराब झालेले रिलेशनही बर्यापैकी सुधारले आहे. दीपिका म्हणाली, आम्हा दोघींच्या नात्याविषयी लोकांमध्ये बर्याच अफवा पसरत राहिल्या आहेत. माझ्या मनात तिच्याविषयी कायम आदर राहिला आहे. इतक्या वर्षांत ती ज्या प्रकारे राहिली आहे, कामाविषयी तिचा ज्याप्रकारे दृष्टिकोन आहे, मी त्याचा आदर करते. ती नेहमीच माझ्याकरिता प्रिय राहिली आहे. आमच्या दोघींचे नातेही बरेच शांततापूर्ण ठरले आहे. अलीकडेच कतरिना दीपिकाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर या दोघींनी एकमेकींना इंस्टाग्रामवर फॉलो केले. कतरिनाने यावरदेखील म्हटले होते की, दीपिकाला फॉलो बॅक करण्याचा विचार तिच्या मनात स्वाभाविकपणे आला होता.


No comments:

Post a Comment