Friday, February 28, 2020

दुर्मिळ औषधी वनसंपदा जपा: डाॅ. विनोद शिंपले

जत,(प्रतिनिधी)-
भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश असून अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजाना आहे. या दुर्मिळ औषधी वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने प्रामाणिक प्रयत्न करावा असे प्रतिपादन डाॅ. विनोद शिंपले यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वनस्पतीशास्त्र विभाग, सायन्स असोसिएशन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत "औषधी वनस्पती: ओळख व संवर्धन" या एक दिवसीय कार्यशाळेत 'पश्चिम घाटातील औषधी वनसंपदा' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते.

वाचण्यातून, बोलण्यातून भाषा समृद्ध होते : लवकुमार मुळे

जत,(प्रतिनिधी)-
आपल्या सभोवताली जे घडते, आपण जे पहातो, अनुभवतो आणि आपण जे वाचन करतो त्यातून आपले व्यक्तीमत्व तर घडतेच, पण त्यातून आपली भाषा समृद्ध होण्यासाठीही मदत होते. त्यासाठी सर्वांनी वाचन, मनन, निरीक्षण आणि जाणीवपूर्वक मराठीचा वापर केला पाहिजे, असे मत कवी लवकुमार मुळे यांनी मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव व कविवर्य नारायण सुर्वे कवी मंच, रड्डे यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

Wednesday, February 26, 2020

शाळेत मराठीची सक्ती योग्य, भाषा विकासासाठी हवे प्राधिकरण

मराठीच्या संवर्धनासाठी व्यापक उपाययोजनांची गरज : मराठीतील विविध बोलीभाषांचेही व्हावे जतन
जत,(प्रतिनिधी)-
मराठी ही आपली मातृभाषा. अमृतातेही पैजा जिंके, असे मराठीचे वर्णन संत ज्ञानेश्‍वरांनी केले आहे. मात्र, आज मराठीची अवस्था काय आहे? मराठीला वैभवाचे दिवस आणण्यात आपण सर्व तिची लेकरे कमी पडत आहोत. शासकीय कामकाजात मराठी भाषा असली तरी ती घरातून मात्र हद्दपार होत आहे. आता शासनाने अभ्यासक्रमात मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे मराठीच्या संवर्धनाला हातभार लागेल. पण केवळ एवढय़ावर भागणार नाही तर मराठीसाठी स्वतंत्र प्राधिकारणही हवे, अशी मागणी केली जात आहे.

Tuesday, February 25, 2020

भोंदू बाबाने केले पाच बहिणींवर अत्याचार

पुत्रप्राप्ती आणि घरात असलेले गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीमध्ये २२ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' पुस्तकाचे प्रकाशन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' बालकथा संग्रहाचे प्रकाशन कुपवाड (सांगली) येथे पार पडलेल्या सहाव्या जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात 'किशोर' मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्याहस्ते पार पडले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सांगली), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे विद्यार्थी साहित्य संमेलन कुपवाड (सांगली) नवकृष्णा व्हॅली  येथे पार पडले. यावेळी लेखक,शिक्षक आणि पत्रकार असलेल्या मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' या बालकथा संग्रहाचे प्रकाशन झाले.

Monday, February 24, 2020

वर्षात 42 हजार लोकांना सर्पदंश


 महाराष्ट्रात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. २0१८-२0१९मध्ये महाराष्ट्रात ४२ हजार २६ जणांना सर्पदंश झाला असून त्याखालोखाल पश्‍चिम बंगालमध्ये ३६ हजार ८५८ घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नाशिकमध्ये सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडल्या असल्याचेही एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

Sunday, February 23, 2020

संत निरंकारीमार्फत ग्रामीण रुग्णालयांची साफसफाई


जत,(प्रतिनिधी)-
स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँम्बेसेडर असलेल्या संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशनच्यावतीने संत निरंकारी मंडळाचे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन (दिल्ली) शाखा जत  सेवादल युनिट क्रमांक ११६१  यांनी ग्रामीण रुग्णालय जत येथे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविले. देशभरामध्ये एकुण १३२० हाँस्पिटलची स्वच्छता करण्यात आली. जत रुग्णालयाच्या आतील भागाची व बाहेरील संपुर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर जत येथील एस. आर. व्ही. एम. हायस्कुल येथेही स्वच्छता करण्यात आली. यामध्ये सुमारे २०० निरंकारी भाविक भक्त सेवादल महापुरुषांनी सहभाग घेतला.

भूमिहीन व बेघरांना शेतजमीन,घरकुल द्या- संजय कांबळे

जत,(प्रतिनिधी)-
जिल्हयातील भूमिहीन व बेघरांना शेतजमीन व घरकुल देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे.
 राज्यातील भूमीहीनाना पाच एकर जमीन द्यावी याप्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत खालील मागण्या करण्यात येत आहेत.गायरान जमिनीवरील १४ एप्रिल १९९० पर्यंत चे अतिक्रमण नियमित करण्याचा शासन आदेश आहे.

एस.के.कॉम्प्युटर्सचे आमदार सावंत यांच्याहस्ते उदघाटन

जत,(प्रतिनिधी)-
मुस्लिम समाजातील मुलांना धर्माच्या शिक्षणाबरोबर सार्वजनिक शिक्षण देऊन चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जतचे आमदार विक्रम सावंत यांनी जत येथे केले.
जत येथे एस. के.कॉम्प्युटर्स सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस या दुकानाच्या उदघाटन सोहळयानिमित्त बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रभाकर कोळी, भुपेंद्र कांबळे, रज्जाकभाई नगारजी, सलीम गंवडी, सलीम पाच्छापूरे, सुनिल गणेश कुलकर्णी यांची होती.

बोर्गी सरपंचांसह सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जत,(प्रतिनिधी)-
जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मुलभूत विकासाची कामे मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच वाड्यावस्त्यांसह जत नगर पालिका क्षेत्रातील दहा गावांच्या विविध विकास  कामाचे प्रस्ताव मी महाविकास आघाडी सरकारकडे सादर केलेअसून ती कामे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेऊ अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी बोर्गी (ता.जत) येथे बोलताना केले.बोर्गी (ता.जत)  येथील सत्ताधारी संरपचासह अनेक सदस्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

Saturday, February 22, 2020

करजगीत घरास आग ; सव्वा लाखाचे नुकसान

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील करजगी येथील मरमसाब मस्तान जतकर यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले. त्यात संसारउपयोगी साहित्यासह रोख रक्कम ,अर्धा तोळे सोन्याचे दागिने असे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले.करजगी -मोरबगी रोडला जतकर यांचे घर वजा छप्पर आहे.शनिवारी सकाळी अचानक घरास आग लागली. बघता बघता आगीने उग्ररूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

Thursday, February 20, 2020

विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे वाचावीत:मच्छिंद्र ऐनापुरे

जत,(प्रतिनिधी)-
जीवनात यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे वाचावीत, असे आवाहन ज्येष्ठ लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी जिरग्याळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय लोहार होते.

Monday, February 17, 2020

जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन 25 रोजी

गौतम पाटील संमेलनाध्यक्ष
सांगली,(प्रतिनिधी)-
 येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग (प्राथमिक माध्यमिक) जिल्हा परिषद सांगली व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय 6 वे विद्यार्थी साहित्य संमेलन मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम, कुपवाड एमआयडीसी, सांगली येथे संपन्न होत असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून गौतम बाहुबली पाटील इयत्ता सातवी,समडोळी यांची निवड झाली आहे.