Wednesday, December 26, 2018

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिल्लीला जाणार


माजी आमदार प्रकाश शेंडगे
जत,(प्रतिनिधी)-
 पंढरपूर येथे शिवसेनेच्या महामेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होऊ, असे आश्वासन दिल्याने आपण धनगर समाजातर्फे ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. धनगर समाजाचा आरक्षणासाठी आता धनगर समाजाचे नेतेही एक शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शेंडगे म्हणाले, मराठा समाज आरक्षणात शिवसेनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाचा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या भूमिकेचे धनगर समाज स्वागत करीत आहे. ठाकरे यांनी या समाजाच्या आशा आरक्षणाबाबत पल्लवित केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागज येथे धनगर आरक्षणाची केंद्राकडे शिफारस करण्याची घोषणा केली आहे. परंतु ही घोषणा फसवी आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपचे शासन आहे. भाजपने लगेचच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आरक्षण देण्याची घोषणा करावी, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली. मुख्यमंत्री एकीकडे आरक्षणाची शिफारस करण्याची भाषा बोलतात. तर दुसरीकडे सत्तेत असलेला शिवसेना पक्ष आणि त्यांचे प्रमुख धनगर समाजाचा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतात. शिवसेनेची भूमिका रास्त आहे. भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ केली, तर सेनेने सरकारचा टेकू काढून घ्यावा आणि हे सरकार पाडावे, असे शेंडगे म्हणाले.
धनगर आरक्षणावरटीसनावाचे भूत मुख्यम ंत्र्यांनी समाजाच्या मानगुटीवर बसवले आहे. हा भूतकाळ जाता जाईना; परंतु भाजपने लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी आरक्षणाची घोषणा केली नाही, तर महाराष्ट्रावर आणि देशावर बसलेले भाजपरुपी भूत गाडून टाकू, असा इशारा शेंडगे यांनी दिला. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही कोणालाही भेटायला तयार आहोत. शेंडगेबापू यांच्या आचार- विचारांची मशाल घेऊन धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यात कुठेही मागे हटणार नाही, असेही प्रकाश शेंडगे म्हणाले.

No comments:

Post a Comment