Sunday, December 23, 2018

अमेय झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये


मराठीचा युवा स्टार अभिनेता अमेय वाघ आपल्या चाहत्यांना एका मागून एक आश्चर्याचे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेयने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे, लवकरच निगेटिव्ह भूमिकेतून झळकणार असल्याची माहिती दिली होतीया बातमीची चर्चा होत असतानाच, त्याने आणखीन एका नव्या प्रोजेक्टबद्दल सांगत त्याच्या चाहत्यांना खूश करून टाकलं आहे. ती बातमी म्हणजे, अमेय लवकरच एका सुप्रसिद्ध हिंदी वेबसीरिजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे.

डिंग इंटरटेनमेंट निर्मित आणि अनिरुद्ध सेन दिग्दर्शितअसुराअसे त्याचे नाव असून, वूट अॅपवर प्रदर्शित होणारी ही एक थ्रिलर गोष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेयची यात महत्त्वपूर्ण भूमिका असून, तो पहिल्यांदाच अशा थ्रिलर वेबसीरिजमध्ये काम करताना दिसून येणार आहे. हिंदीच्या नावाजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या या वेबसीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीची प्रमुख भूमिका आहे. ‘असुराया वेबसीरिजच्या निमित्ताने अर्शदसोबत काम करण्याची संधी अमेयला मिळणार असल्याकारणामुळे, तोदेखील खूप उत्सुक आहे. इतकेच नव्हे तर, नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या वेबसीरिजनंतर, अमेयकडे त्याच्या चाहत्यांसाठी आणखीन एक मोठे सरप्राईज आहे ! मात्र ते काय आहे, हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment