जत तालुक्यातील संख येथे मोटारसायकलीच्या झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले.ही घटना काल
रात्री संख तिकोंडी रस्त्यावर तलाव फाटा येथे झाली. यामध्ये सुहास दशरथ गंभीरे( वय
27,रा रामकृष्ण नगर कुपवाड),भालचंद्र
सिद्राम तिगनीबिद्री (वय 37, दत्तनगर बामनोली, मूळ गाव नंदरगी ता इंडी जि विजापूर) अशी मृतांची नावे आहेत हे दोघे घरगुती
कार्यक्रमाला चालेले होते.उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
अधिक माहिती अशी ,कुपवाडहून
भालचंद्र तिगनीबिद्री व सुहास गंभीरे (एम एच 10 बी टी 2192) होंडा ड्रीम या मोटारसायकलने नंदरगी
येथे चालले होते. भालचंद्र यांच्या दुस-या पत्नीच्या
डोहाळ जेवण कार्यक्रमाला चालले होते.संख तिकोंडी रस्त्यावर तलाव फाटा येथे मोठे
वळण आहे.वळणामध्ये गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला खड्यात जाऊन पडले
खड्यामध्ये मोठ मोठी दगडे आहेत. त्या दगडावर जोराने गाडीसह दोघांचे डोके आपटली आहेत.अंगावर गाडी पडली होती. छाती डोक्याला गंभीर
दुखापत झाली आहे.
रक्तश्राव मोठ्याप्रमाणात झाला आहे. रात्रीच्या वेळी उशीराने अपघात झाल्याने कुणाच्याही लक्षात
आलेला नाही या रस्तावर रात्रीच्यावेळी अकरानंतर फारशी वर्दळ नसते.डोक्याला गंभीर
दुखापत रक्तश्राव झाल्याने मृत्यू झाला आहे. परिसरात ओळखीचे कोणी नसल्याने लवकर
ओळख पटली नाही.सकाळी ग्रामस्थांनी पोलिस पाटील यांना सांगितले. पोलिस आल्यानंतर
मृतांचे आधार कार्ड संघटनेच्या ओळखपत्रांनी माहिती मिळाली.
भालचंद्र तिगनीबिद्री हा कुपवाड येथील बी आर
इंजिनिअरींग कंपनीचे मालक आहेत याच्या मागे दोन पत्नी,तीन मुली,एक मुलगा आई,वडील असा
परिवार आहे.सुहास गंभीरे हा मूळचा बीड येथील रहिवासी आहे. मराठा स्वराज्य संघाचा
सांगली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहे.त्याची घरची परिस्थिती गरीबीची
आहे.चार वर्षापूर्वी लग्न झाले आहे आई वडीलालांचा पाच वर्षापूर्वी मृत्यू झाला
आहे. मामाच्या चटाई कारखान्यात काम करीत आहेत. त्यांच्या पाश्चात्य आई वडील,
पत्नी एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

No comments:
Post a Comment