Thursday, September 16, 2021

रक्षा समर्पण


स्वामी विवेकानंद भारत परिक्रमा करत असत. परिक्रमा करत असताना एका छोट्या खेड्यात आले. एका छोट्या झोपडीसमोर येऊन त्यांनी पाणी मागितले. घरातून एक म्हातारी बाहेर आली. तिने आधी त्यांची चौकशी केली, मग त्यांना घरात बोलावले. एक ग्लासभर दुधात चिमूटभर पूड मिसळून त्यांना दिले. नंतर पाणीही दिले. विवेकानंदांनी ते दूध, पाणी प्यायले. तेव्हा ती म्हातारी एकाएकी भावनातिरेकाने रडू लागली.

स्वामीजींनी तिला रडण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, माझा मुलगा दोन वर्षांपूर्वी वारला, त्याची रक्षा गंगेत समर्पण करण्याची माझी फार इच्छा होती. पण मला ते शक्य झाले नाही. तू गंगा परिक्रमा करून आला आहेस, तुझ्या शरीरात गंगेच्या पाण्याचा थोडा तरी अंश असेल. मी मुलाची चिमूटभर रक्षा दुधात मिसळून तुला दिली. निदान तिथे तरी ती रक्षा गंगेला मिळाली. मी तुला आधी सांगितले नाही, ही फसवणूक झाली. मी त्याबद्दल तुझी क्षमा मागते. पण आज माझ्या

मुलाला मुक्ती मिळाली या आनंदामुळे हे अश्रू आले आहेत. यावर स्वामी विवेकानंदानी आजीला सांगितले की तुमचे योग्य आहे. तुमच्या पुत्राची रक्षा गंगेला मिळाली आहे असेच समजावे. कारण तुम्ही या वयात वाराणशीला जाऊ शकत नाही. हे त्यांचे बोल ऐकून आजींचे डोळे अजूनच पाणवले. स्वामी विवेकानंदांची

पाठ थोपटत त्यांनी त्यास आशीर्वाद दिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी आज्जीच्या निरोप घेऊन पुढील तिर्थटनास निघाले.

*******

स्थळ पसंत पडून मुलाकडची मंडळी होकार देणारच होती...

तेवढ्यात किचनमधून आवाज आला, आई चहासाठी किती शिट्ट्या...?

मुलाकडचे आम्ही येतो...सांगायला पण थांबले नाहीत...!


Monday, September 13, 2021

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की ....


आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्यांना कवडीची किंमत राहात नाही. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका,विश्वास मात्र जरुर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जातं... "!!

●●●●●●●●●●●●●●●●●●

काल हॉटेल मध्ये एका विचित्र माणसाला बघितलं... ना लॅपटॉप वर काम करत होता, ना व्हॉट्सअॅप बघत होता, ना मेसेज. फोनवर पण बोलत नव्हता आणि सेल्फी पण घेत नव्हता... ....नुसता कुटुंबाबरोबर गप्पा मारत होता... गावंढळ कुठचा !!!

●●●●●●●●●●●●●●●●●●●

घरी खोकल्याचं औषध पिताना मुद्दाम तोंड वेडंवाकडं करावं लागतं म्हणजे घरच्यांना खात्री पटते की पोरगा अजून बिघडलेला नाही...

●●●●●●●●●●●●●●●●●●●

एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं. शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायच्या वेळी गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात.

लग्नात हार घालण्याच्या वेळी तिला नवऱ्या मुलाच्या

टोपीवर किडा बसलेला दिसतो. तो पाहून ती ओरडते, 'तिडा तिडा' त्या आवाजाला घाबरुन नवरा मुलगा अजून जोरात ओरडतो.. 'तुताय तुताय?'

●●●●●●●●●●●●●●●●●●●

बायकांची प्रार्थना....

हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे

माझ्यासाठी काही नको त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी

बघते...

●●●●●●●●●●●●●●●●●●●

लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही

तरुणपणी म्हणते तुम्हाला काही कळत नाही

म्हातारपणी मुले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही

पुरुषांना कळण्याचे वय केव्हा येते हेच काही कळत नाही...


Sunday, September 12, 2021

आपण आपले गुण ओळखावे...,

आपण आपले गुण ओळखावे...,

दोष सांगण्यासाठी लोक आहेतच.....

पाऊल टाकायचे असेल तर पुढे टाकावे..,

मागे ओढायला लोक आहेतच.....

स्वप्न पाहायचे असतील तर मोठेपणाचे पहावे..,

कमीपणा दाखवायला लोक आहेतच...!

*****

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे ? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय.

*****

दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर,

घड्याळ म्हणते काळाची पाऊले ओळख......

खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव....

देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप......

छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव.पण

जमीन....म्हणते पावले मात्र माझ्यावरच राहू देत....

*****

नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.

●●●●●●●●●●●●●●●


एका महिलेच्या व्रताने प्रसन्न होऊन देव बाप्पा प्रकट झाले आणि त्या महिलेला म्हणाले...'मुली, काय हवा तो वर माग!!'

ती महिला म्हणाली,'माझा नवरा माझ्याशिवाय कुठेही जायला नको..."

"अजून काही ?"

माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात माझ्यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण काहीही नसावं...."

"अजून काही ?"

"मला बघितल्याशिवाय त्याला झोप येऊ नये ..."

"अजून काही?"

"जेव्हा तो सकाळी झोपेतून उठेल व डोळे उघडेल त्यावेळी सगळ्यात पहिले त्यानं मला बघावं..."

"अजून काही ?"

"आणि मला जरा देखील खरचटलं तरी वेदना माझ्या नवऱ्याला व्हाव्यात..."

"अजून काही?"

"बस... एवढं पुरेसं आहे देवा!"

"तथास्तु!"

आणि तात्काळ त्या महिलेचं रुपांतर स्मार्ट फोनमध्ये झालं...!!!


Saturday, September 11, 2021

धन म्हणजे काय?


वडिलांनी घरी आल्यावर आपल्याला पूर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडिलांनी टीव्ही बंद करून आणि स्मार्टफोन बाजूला ठेवून मुलांना दिलेला १०० टक्के वेळ हे. मुलांचे ... 'धन'...

 वैवाहिक आयुष्यातील २० वर्षे पूर्ण झाल्यावरसुद्धा जो आपल्या पत्नीला तिच्या गुण-दोषासकट स्वीकारून सांगतो 'माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे'' तो क्षण म्हणजे पत्नीचे... 'धन'

आपल्या मुलाने आपली देखभाल करावी असे वार्धक्यामुळे थकलेल्या आई-वडिलांना जेव्हा वाटते आणि तेव्हा मुलगा ती इच्छा पूर्ण करतो, तो क्षण म्हणजे आई-वडिलांचे 'धन'

ह्या तीनही क्षणांचा त्रिवेणी संगम ज्याच्या आयुष्यात होतो ते खरे "धनवान"

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

भारताचे लोक हेल्मेट घालणार नाहीत पण मोबाईलला स्किनगार्ड नक्की लावणार....| डोकं फुटुन रक्त वाहत गेलं तरी चालेल पण मोबाईलला स्कॅच येता कामा नये!

*****

"गेले तीन दिवस कसंतरीच होतंय डॉक्टर."

"वेगळं काय केलंत या तीन दिवसात?"

"अं सगळं नेहमीचंच..... फक्त नेट बंद होतं चार दिवस."

"...मग विशेष काही नाही. माझं वायफाय वापरा आणि एखादं पोस्ट टाका."

"का हो डॉक्टर ?"

"...तुम्हाला बद्धपोस्ट झालंय !"


Friday, September 10, 2021

लग्न? लग्न म्हणजे काय असतं...


लग्न... ते सुंदर जंगल आहे. जिथे बहादुर वाघांची शिकार हरणी करतात! लग्न म्हणजे... अहो ऐकलंत का? पासुन ते बहिरे झालात की काय? पर्यंतचा प्रवास!

 लग्न म्हणजेच... तुझ्या सारखे या जगात कुणीच नाही... पासून... तुझ्या सारखे छप्पन बघीतलेत!

लग्न म्हणजे... तुम्ही राहुद्या... पासून ते... मेहरबानी करून, तुम्ही तर राहुच द्या... पर्यंतचा प्रवास...

कुठे होती माझी राणी... पासून तर... कुठे मेली होतीस... पर्यंतचा प्रवास...

लग्न म्हणजेच... तुमचे नशीब मी भेटले तुम्हाला... पासून ते... मेलं माझंच नशीब फुटकं, तुम्ही मला

भेटलात... पर्यंतचा प्रवास...

वैवाहिक जीवन हे कश्मीरसारखे आहे. सुंदर तर आहे

परंतु दहशत पण आहे!

******

अंमली पदार्थ विरोधी पथकाचा ऑफिसर पाटलाच्या शेतात आला. "तू ड्रगची अवैध शेती करतोय म्हणे.

मला तपासणी करायचीय.." त्याने गुर्मीत विचारलं..

पाटील म्हणला.." तसं काय नाय ओ साहेब... तुमी पायजे तर तपासून बघा.. पण एक करा शेताच्या त्या

कोपऱ्यात जाऊ नका."

ऑफिसर भडकून म्हणाला,"... तू कोण मला सांगणार रे दिडशाण्या... माझ्या कडे ॲथोरिटी लेटर आहे."

त्याने खिशातनं आयडी काढलं... बघितलं? या आयडीचा अर्थ असा की, मी पाहिजे तिथे जाऊ शकतो.. कुणाच्याही जमिनीत घुसू शकतो. कोणाची हिम्मत नाय मला अडवायची.. कळलं?

पाटलानी निमुट मान हलवली.

साहेब शेतात गेला. थोड्याच वेळात एक मोठी किंकाळी शेतात घुमली. पाठोपाठ जीव खाऊन धावणारा साहेब ओरडताना दिसला.

शेतातला वळू नाक फुरफुरवत सायबामागे धावत होता.

साहेबाचे तीन तेरा वाजले होते. कोणत्याही क्षणी वळू गाठणार आणि शिंगावर घेणार अशी लक्षणं होती.

पाटील हातातलं काम टाकून कुंपणाकडे धावला व जीव खाऊन ओरडला".... साहेब आयडी... आयडी दाखवा त्याला..."


Wednesday, September 8, 2021

श्रेष्ठ कोण?


एक दिवस देव आणि राक्षस मिळून प्रजापतीकडे गेले आणि त्यांना विचारले, आमच्यात मोठे कोण? प्रजापतीने सांगितले की तुम्ही सारे आज माझ्याकडे जेवायला थांबा, जेवण झाले की तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो.

देव ३३ कोटी, राक्षसही कितीतरी कोटी! त्यामुळे प्रजापतीने सुचवले की आपण दोन पंगती करू. राक्षसांना प्रत्येक गोष्टीची घाई. ते म्हणाले, पहिल्या पंगतीला आम्ही येणार. प्रजापतीने सगळी तयारी केली. पाने मांडली, वाढून तयार झाली. राक्षस घाईघाईने आले. प्रजापती दुरून पहात होता. राक्षसांनी जेवायला येण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुतले नाहीत. सगळे राक्षस पंगतीत बसेपर्यंतही आधी आले त्यांना दम नव्हता. त्यांनी लगेच जेवायला सुरवातही केली. तेव्हा प्रजापतीने एक मंत्र म्हटला त्याबरोबर राक्षसांचे हात कोपरात ताठ होऊन गेले. पानातला घास तर उचलला. पण कोपरात हात वाकेना, त्यामुळे घास तोंडात जाईना. तासभर प्रयत्न केला तरी राक्षस उपाशीच राहिले. संपली, प्रजापतीने लगोलग दुसऱ्या पंगतीची तयारी केली . देव स्वच्छ हातपाय धुवून आले. गोंधळ न करता शिस्तीत पानांवर बसले. त्यांनी सामूहिक भोजनमंत्र म्हटला. जेवायला सुरवात करणार तेवढ्यात प्रजापतीने पुन्हा त्याच मंत्राचा प्रयोग केला, देवांचेही हात कोपरात ताठ झाले. घास तोंडात घालताच येईना. देवांनी इकडे तिकडे पाहिले. सर्वांचीच तशी अडचण होती. तेव्हा देवांनी एक युक्ती केली . प्रत्येकाने आपल्या शेजारच्या देवाला भरवले. स्वतःच्या तोंडात हात पोचत नव्हता तरी तो शेजारच्याच्या तोंडापर्यंत जात होता. काहीच सांडलवंड झाली नाही. सर्वांचे जेवण अगदी व्यवस्थित झाले. सगळे जण नंतर प्रजापतीकडे आले, आमच्यात मोठे कोण?

प्रजापतीने सांगितले की मोठेपण हे दिसण्यावरून ठरत नाही कृतीरून ठरते. जेवताना जे काही घडले त्यावरून आपले आपणच सिध्द झाले आहे की श्रेष्ठ कोण ?

तात्पर्य : जो फक्त स्वतःचे पोट भरण्याचा विचार करतो, तो स्वतःही उपाशीच राहतो व दुसऱ्याच्याही कामी येत नाही. हेच राक्षसांच्या बाबतीत घडले. देवांनी एकमेकांची काळजी घेतली. त्यामुळे सगळेच संतुष्ट झाले. फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करणाऱ्यांपेक्षा संपूर्ण समाजाच्या हिताचा जे विचार करतात तेच श्रेष्ठ!

******

शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात. पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो आकर्षक साडी सेल. तिसरा दुकानदार पाटी लावतो - जबरदस्त साडी सेल. मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो . मुख्य प्रवेशद्वार..


Sunday, September 5, 2021

स्वर्गाचा दरवाजा


एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली. काळा ढग पाण्याने जड झाला होता. तो जमिनीकडे उतरत येत होता. गोरा ढग अगदी हलका होता. तो उंच आभाळात चढत होता. भेट झाल्यावर गोऱ्या ढगाने काळ्याला विचारले, कुठे चाललास? काळा ढग म्हणाला, जमिनीकडे. मी तिथे जाऊन पाऊस पाडणार आहे. माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे धरणी मातेला देऊन टाकणार आहे.

जमीन उन्हाने तापली आहे. नद्या, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. झाडेपण सुकून गेली आहेत. शेतकरी आतुरतेने माझी वाट पहात आहेत. मला जरा घाईने गेले पाहिजे. गोरा ढग त्याला हसला. त्याला म्हणाला, वेडाच आहेस. आपली संपत्ती कधी अशी कोणी जगावर उधळून देतो का? तुझ्यातले पाणी

संपले कि तुझे आयुष्यच संपले की! मी चाललोय स्वर्गात. देव बाप्पाच्या घरी एक जागा रिकामी झालीय. ती मला मिळेल. गोऱ्या ढगाला खूप घाई होती. तो धावतच पुढे निघाला, काळा ढग हळूहळू जमिनीपर्यंत आला. मुसळधार पाऊस झाला. काळा ढग अदृष्यच झाला. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले. तलाव विहिरी काठोकाठ भरले. सारे रान हिरवेगार झाले. शेतकरी सुखावले.

गोरा ढग वर जाताना ते पहात होता. काळ्या ढगाच्या

वेडेपणाला तो हसला. पाहता पाहता स्वर्गाचा दरवाजा आला. गोऱ्या ढगाने दार ठोठावले. एका देवदूताने ते उघडले. त्याने गोऱ्या ढगाला विचारले, तुझे देवबाप्पाकडे काय काम आहे?

गोरा ढग आपल्याच तोऱ्यात होता. तो म्हणाला, मी इथे

रहायलाच आलोय, स्वर्गात एक जागा रिकामी झालीय. ती मलाच मिळणार! उघड दरवाजा. दार उघडायच्या ऐवजी देवदूताने ते लावूनच घेतले. लावता लावता तो म्हणाला, ती रिकामी जागा आता भरलीय. देवबाप्पा स्वतः विमान घेऊन गेले होते व त्या काळ्या ढगाला स्वर्गात घेऊन आले. ज्याने आपले सर्वस्व देऊन

पृथ्वीवर आनंदी आनंद निर्माण केला, त्याच्यापेक्षा आणखी चांगली व्यक्ती कोण असणार?

तात्पर्य : समाजासाठी सर्वस्व समर्पण करणे हाच मोक्ष आहे. आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सुखी करणे, त्यांना काही न काही मदत करणे यातूनच माणूस सुखी समाधानी होऊ शकतो.

*******

शाळा : शाळेत उशिरा आले की शेवटच्या बाकावर बसावे लागते.

कॉलेज : कॉलेजमध्ये उशिरा आले की पहिल्या बाकावर बसावे लागते.


Saturday, September 4, 2021

मालक स्टीव्ह जॉब्जचे शेवटचे शब्द


ऍपल (आय-फ़ोन ) चा मालक स्टीव्ह जॉब्ज स्वादुपिंडाच्या कॅन्सर ने २०११ साली मृत्यू पावला.त्याचे हे शेवटचे शब्द ...

व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली... इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले... तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय. आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्यु जवळ श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं: त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा समाजसेवा करणे. सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा... आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही... जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" … आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य" " काळ " " समय ".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक". सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो. स्वत:कडे दुर्लक्ष  करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा.

लोक माणसं वापरायला शिकतात, आणि पैसे जपायला शिकतात वास्तविक पैसा वापरायला हवा,आणि माणसं जपायला हवीत.आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते,आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा,आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...!!!*

जीवनाचा खरा अर्थ


समर्थ रामदास नेहमी या गावातून त्या गावात भ्रमण करत असत. असेच ते एकदा मावळ प्रांतात भ्रमण करत होते. त्यांनी काही दिवस एका गावात राहण्याचे ठरवले. त्या गावात समर्थ रामदास स्वामी एकेका आळीमध्ये जाऊन पाच घरांत भिक्षा मागत असत. एका गावात कोणीतरी सांगितले की एक म्हातारी एकटी रहाते. ती कधीच कोणाला काही देत नाही. घरी गडगंज धन आहे. पण कुणाला कधी काही मदतही करत नाही. समर्थ त्या घरासमोर गेले व भिक्षा मागितली. ती म्हातारी घरातूनच ओरडली, की मी काही देणार नाही. माझ्याकडे देण्याजोगे काही नाही. तरी समर्थांनी प्रयत्न सोडला नाही. ते म्हणाले, तुझ्याकडे जे काही आहे ते तू दे. मला त्याचे वाईट वाटणार नाही. आता त्या म्हातारीला खूप राग आला. ती पुढे आली व अंगणातली मूठभर माती तिने समर्थांच्या झोळीत टाकली. समर्थांनी आशीर्वाद दिला व ते पुढे गेले.

असे ३-४ दिवस झाले. तेव्हा त्या म्हातारीने त्यांना विचारले, मी झोळीत माती टाकली तरी तुम्हाला राग येत नाही? काय करता तुम्ही या मातीचे ? तेव्हा समर्थ तिला म्हणाले, तुझ्याकडे देण्याजोगे खूप आहे; पण तुझ्याजवळ दानत नाही. कमीत कमी माती तरी देण्याची सवय तुझ्या हाताला लागू दे. ती लागली तर अजूनही बरेच काही तू देऊ शकशील.

तात्पर्य : सत्कार्यासाठी दान देणे हा एक संस्कार आहे. तो संस्कार रुजला तर आपल्या जवळची प्रत्येक चांगली गोष्ट समाजाला द्यायची इच्छा होते. पण समाजकार्यासाठी वेळ द्यायची एकदा सवय लागली की त्यातून समाजकार्यासाठी आपले सगळे जीवन समर्पित करणारे कार्यकर्ते तयार होतात.

@@@@@@@@@@@@@@@@

काल नेट बंद होते म्हणून रात्री ८ वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली, घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेले म्हणे आमचा पोरगा रात्री २-२ वाजेपर्यंत जागतो आज बेशुद्ध का झाला?