जत,(प्रतिनिधी)-
अमरावती
येथील आदिशक्ती बहुद्देशीय संस्थेतर्फे वाङ्मय व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी
देण्यात येणार्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
करण्यात आले आहे. संस्थेतर्फे संशोधन लेखन, समाजप्रबोधन साहित्य लेखन, काव्य लेखन, पर्यावरण साहित्य लेखन, संत साहित्य लेखन, उल्लेखनीय साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, नाट्यलेखन, सामाजिक लेखन, राष्ट्रभक्ती
साहित्य लेखन, बालसाहित्य लेखन, अनुवाद
लेखन, चरित्र लेखन, आत्मचरित्र लेखन,
कृषी साहित्य लेखन, शाहीर वाड्मय अशा विविध प्रकारांत
पुरस्कार दिले जाणार आहेत. 19 फेब्रुवारीला सांगली येथील विश्रामबाग
शिक्षण संस्थेत पुरस्कार वितरण होईल.
No comments:
Post a Comment