लहान मुलाचा मात्र मृत्यू
जत,(प्रतिनिधी)-
आसंगी - जत ( ता. जत ) येथील संगीता भानुदास गडदे ( वय २२ ) या विवाहित महिलेने सव्वा महिन्याच्या बाळाला ( पुरुष ) बरोबर घेऊन बाळाला विहिरीच्या काठावर ठेवून विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला .परंतु सदरची विवाहिता गंभीर असून तिच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत .तर बाळाचा भुकेने व्याकूळ होवून व थंडीमुळे मृत्यू झाला आहे .ही घटना काल सकाळी साडे साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
याप्रकरणी आसंगी जत ग्रामपंचायत सरपंच श्रीमंत रावसाहेब पाटील यांनी उमदी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , संगीता व भानुदास यांचा सुमारे अडीच वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. भानुदास हा शेतमजूर आहे . संगीता ही कौंटूबिक वादातून काही दिवसापासून माहेरी कोकळे ( ता.कवठेमंकाळ ) येथे राहत होती . सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान ती सासरी असंगी जत येथे आली होती. कौटुंबिक वादातून भानुदास व संगीता यांच्यामध्ये मतभेद होते मामाला बोलून घेऊ व आपल्यातील मतभेद मिटवू अशी सूचना भानुदास याने संगीता हिला सायंकाळी माहेरहून आसंगी जत येथे आल्यानंतर केली होती . संगिताचे मामा आसंगी जत गावालगत शेतात राहतात . सोमवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर मंगळवारी पहाटे कधीतरी उठून जाऊन संगीता हिने गावालगत असलेल्या तुकाराम टोणे यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे .यावेळी तिने सहा महिन्याच्या बाळाला विहिरीच्या काठावर ठेवले होते . विहिरीत उडी घेतल्यानंतर संगिता हिने पाण्यातील विद्युत मोटारीच्या पाइपला धरून ती तशीच थांबून राहिली होती.सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान तुकाराम टोणे यांचा मुलगा अरुण हा विहीरी जवळ गेला असता त्याला विहीरीच्या काठालगत मृत अवस्थेत असलेले सव्वा महिन्याचे बाळ आढळून आले त्यानंतर त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता संगीता ही पाइपला धरून थांबली होती .सदर घटनेची माहिती त्यांनी गावातील नागरिकांना दिली.त्यानंतर कांहीं तरुणांनी विहिरीत उतरून संगीता हिला बाहेर काढून उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे . सतत पाच - सहा तास थंड पाण्यात थांबल्यामुळे तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास उमदी पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment