Saturday, December 22, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली जिल्हा दौऱ्यावर

जत,(प्रतिनिधी)-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 12.50 हेलिकॉप्टरने नागज हेलिपॅड, ता. कवठेमहाकाळ जि. सांगली येथे आगमन. दुपारी 12.55 वाजता मोटारीने नागजकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता नागज येथे आगमन. दुपारी 1. वा. राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 वरील सांगली-सोलापूर मार्गावरील सांगली-बोरगाव-वाटंबरे-मंगळवेढा-सोलापूर मार्गांचे चौपदरीकरण व राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 व क्र. 266 वरील विविध दुरूस्ती कामांचे कोनशिला समारंभ व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना वचनपूर्ती समारंभ.

दुपारी 2.15 वाजता मोटारीने नागज हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.25 वाजता नागज हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 2.30 वाजता हेलिकॉप्टरने मौजे रेड, ता. शिराळाकडे प्रयाण. दुपारी 2.50 वाजता रेड हेलिपॅड, ता. शिराळा येथे आगमन. दुपारी 2.55 वाजता मोटारीने मौजे रेड (सह्याद्री पब्लिक स्कूलजवळ), कडे प्रयाण. दुपारी 3 वाजता सह्याद्री पब्लिक स्कूलजवळ, रेड येथे आगमन व वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामांचा शुभारंभ व शेतकरी मेळावा. सायंकाळी 4.05 वा. मोटारीने रेड हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 4.10 वाजता रेड हेलिपॅड येथे आगमन. सायंकाळी 4.15 वाजता हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment