जत,(प्रतिनिधी)-
जत येथील
श्री रामराव विधामंदिर हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र
शाखा जत यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यासाठी प्रबोधन कार्यशाळा
घेण्यात आली. यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष मनोहर पवार,
संघटक बाळासाहेब मुजावर, मल्लिकार्जुन जेऊर,
सोमनिंग कोळी, राहुल भोसले, केंचाप्पा पाचंगे उपस्थित होते.
बाळासाहेब मुजावर म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ग्राहक पंचायतीची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
समाजात व्यापारी वर्गाकडून होणारी लूट थांबण्यासाठी ग्राहक हा जागृत
असण्याची गरज आहे. यासाठी ग्राहक पंचायत अहोरात्र कष्ट करत असून
अनेकांना न्याय मि ळवून देण्याचे काम केले आहे. पवार म्हणाले,
जत शहर व तालुक्यात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित तालुक्यातील ग्राहकांच्यामध्ये
जागृती निर्माण व्हावी, यासाठी अनेक प्रबोधनपर शिबिरे घेण्यात
येणार आहेत. ग्राहकांनी निर्भीडपणे फसवणूक करणार्यांच्या विरोधात तक्रारी केल्यास याचा निश्चितपणे आपल्याला
लाभ होईल. गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यामध्ये ग्राहक पंचायतीचे
काम सुरू असून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम या पंचायतीने केले आहे. स्वागत राहुल भोसले यांनी मानले तर प्रास्ताविक मनोहर पवार यांनी केले.
No comments:
Post a Comment